उपवास करणं अभिनेत्रीला पडलं महागात… पाहा अशी झाली अवस्था

उपवास करणं  अभिनेत्रीला पडलं महागात… पाहा अशी झाली अवस्था


मुंबई: कधी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा याच्याशी नाव जोडल्यामुळे तर कधी अभिनव शुक्लासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बातम्यांमधून तर कधी टॉपलेस प्रकरणामुळे सोफिया हयात हे नाव चर्चेत असतं. बिग बॉस या शोमुळेही सोफिया घराघरात पोहोचली. अभिनेत्री, मॉडेल आणि आता आध्यात्मिक गुरू बनलेल्या सोफिया हयातवर अशक्तपणामुळे कोसळण्याची वेळ आली आहे. धार्मिक रितीरिवाज, व्रतवैकल्ये यांच्या अतिआहारी गेल्याने सोफियाला लंडनमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सोफियावर ही वेळ का आली आणि तिने अन्नत्याग का केला याविषयी जाणून घेण्यासाठी सोफियाचे चाहते काळजीत पडले आहेत.

सोफिया ही गेल्या काही दिवसांपासून आध्यात्मात रमली आहे. आध्यात्मात शरीरशुध्दीसाठी लंघन करण्यास सांगितले जाते. अशा प्रकारच्या लंघनामध्ये कडक उपवास करण्याबरोबरच शरीरातील सर्व शुध्दी करण्यासाठी एनिमा केला जातो. सोफियाने ही प्रक्रिया सुरू करताच त्याचे परिणाम तिच्या शरीरावर दिसू लागले काही ती बेशुध्द झाली. हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा सोफियाची अवस्था फारच गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सोफियाच्या शरीरातील सोडियमची मात्रा इतकी कमी झाली की तिची शुध्दच हरपली. उपवासामुळे तिच्यावर ही वेळ आली आहे.

उपचारांना प्रतिसाद दिल्यानंतर जेव्हा सोफियाला थोडं बरं वाटलं तेव्हा तिनेच तिच्या तब्येत खराब होण्याचं कारण सांगितलं. सोफिया म्हणाली की शरीरशुध्दीसाठी उपवास आणि एनिमा असा प्रयोग करत असताना मला अशक्तपणा वाढला. शक्तीपात झाल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. यावेळी नर्सकडून सोफियाने मीठ मागवून घेतलं. ती म्हणाली, सध्या माझं शरीर उपवासाला साथ देत नाहीय. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा माझं शरीर थरथरत होतं. उपवास सोडून मी जेवण घेतल्यावर माझी स्थिती सुधारली. अशाप्रकारचा कडक उपवास मी २०१४ साली केला होता, मात्र यावेळी मला या उपवासाचा चांगलाच त्रास झाला. उपचारानंतर सोफियाला आता बरं वाटू लागलं आहे. हॉस्पिटलमधून तिला नुकतच घरी पाठवण्यात आलं. बरी झाल्याचा आनंद असतानाच सोफियाला अजून एक धक्का बसला तो म्हणजे हॉस्पिटलच्या बिलाचा आकडा बघून, पण आरोग्यविमा असल्याने तिला दिलासा मिळाला.

आता असा जीवावर बेतणारा उपवास सोफियाने का केला असा प्रश्न तिचे चाहते विचारत आहेत. यावरही तिने उत्तर दिलं आहे. सोफियाच्या म्हणण्यानुसार तिला तिचं आयुष्य नव्याने सुरू करायचं आहे. त्यासाठी ती आत्म्याशी संवाद साधू इच्छित आहे. असं झालं तर तिला खाण्यापिण्याची गरजच लागणार नाही असं तिला वाटतंय. त्यासाठीच तिने शरीरशुध्दीसाठी लंघन करण्याचा प्रयोग केला पण तिला काही तो झेपला नाही. पण यावर तिचं असं म्हणणं आहे की, मला यातून सुखरूप बरं करून देवाने माझी मदत केली आहे. आध्यात्मात ही जादू आहे असंही तिनं म्हटलं आहे. सोफियाची ही स्वत:ची मतं आहेत, यामध्ये किती तथ्य आहे हे तिलाच माहिती. मात्र तिच्या या प्रयोगामुळे झालेला उपवास तिच्याच अंगलट आला हे खरं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish