पराभव जिव्हारी, सपाची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त, अखिलेश यादवांचा तडकाफडकी निर्णय

पराभव जिव्हारी, सपाची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त, अखिलेश यादवांचा तडकाफडकी निर्णय


लखनऊ : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. मार्चमध्ये झालेली विधानसभा निवडणूक, लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर अखिलेश यादव यांनी तडकाफडकी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष वगळता इतर सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसह, राज्य कार्यकारिणी युवा आघाडी, महिला आणि इतर सर्व आघाड्या बरखास्त करण्यात आल्या आहेत.

मार्च मध्ये झालेली उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक,उत्तर प्रदेशमधील रामपूर आणि आझमगढ लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पराभूत झाल्यानंतर अखिलेश यादव यांनी पक्षामध्ये फेरबदल करण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशचे अध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांच्याशिवाय इतर सर्व पदाधिकाऱ्यांना पदावरुन काढून टाकण्यात आलं आहे. समाजवादी पक्षाच्या आगामी काळातील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली जाईल.

‘आरे’ला कारे करणाऱ्या आदित्य-अमित ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचं सडेतोड प्रत्युत्तर
समाजवादी पक्षानं उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाच्या कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे अखिलेश यादव यांनी विधानसभा निवडणुकीत १११ जागांवर विजय मिळवल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. समाजवादी पक्षाच्या मित्रपक्षांनी देखील राज्यातील कार्यकारिणी बरखास्त करत नव्यानं बांधणी करण्याचा निर्णय घेतला होता. रामपूर आणि आझमगढ लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक पराभूत झाल्यानंतर अखिलेश यादवांनी मोठा निर्णय घेतला.

मोठी बातमी! अमरावती हत्या प्रकरणात एनआयएकडून UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
२०२४ ची तयारी
अखिलेश यादव यांचा कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्याचं म्हटलं जात आहे. समाजवादी पक्ष कार्यकारिणी बरखास्त करुन पुन्हा नव्यानं संघटनेची रचना करण्याच्या तयारीत आहे. संघटनात्मक निवडणुकांच्या माध्यमातून समाजवादी पक्ष पुन्हा जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. अखिलेश यादव यांच्या या निर्णयाकडे समाजवादी पक्षाकडून गांभीर्यानं पाहिलं जातं आहे.समाजवादी पक्षात अखिलेश यादव यांचा प्रभाव असणारे लोक अधिक असावेत यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षानं १११ जागांवर विजय मिळवला होता. तर, २०१७ च्या निवडणुकीत सपाला ४७ जागा जिंकता आल्या होत्या.
शिवसेनेने त्या ३९ आमदारांवर छडी उगारली, व्हीप न पाळल्याने आमदारकी रद्द करा, याचिका दाखलSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish