शिंदे-फडणवीसांनी आयोगाशी चर्चा करुन नगरपालिका निवडणुकांना स्थगिती द्यावी : पंकजा
[ad_1]
येत्या १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणाचा निर्णय १८ जुलैला सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीत होणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
ओबीसी समाजाचं सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष होतं. जाहीर झालेल्या निवडणुका घेणं क्रमप्राप्त आहे, मात्र मला सरकारकडून अपेक्षा आहेत. ओबीसी प्रश्नावर लढणारी कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांना माझी विनंती आहे, की त्यांनी निवडणूक आयोगाशी चर्चा करुन तात्काळ आगामी निवडणुकांना स्थगिती द्यावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.
हेही वाचा : बंडखोर संतोष बांगर यांना धक्का: उद्धव ठाकरेंच्या फोनने केली कमाल; प्रमुख पदाधिकारी ‘मातोश्री’सोबत
९२ नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका झाल्यानंतर जर उर्वरित ठिकाणी आरक्षण लागू झालं, तर तो समान न्याय नसेल. या निवडणुकांनाही राजकीय आरक्षण मिळणं हा लोकांचा हक्क आहे. मागच्या वेळीही माझी हीच मागणी होती, त्यात कुठलीही तडजोड नाही, असं पंकजांनी स्पष्ट केलं.
केवळ ओबीसी आरक्षणामुळेच नाही, तर अतिवृष्टी, महापूर, यासारख्या अनेक कारणांमुळे निवडणुकांना स्थगिती देता येईल. पण ओबीसी आरक्षण हेही तितकंच गंभीर कारण आहे. ओबीसी आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता आहे. नोटिफिकेशन काढल्यावर निवडणुका कशा थांबवायच्या हा कोर्टाचा प्रश्न उचितच आहे, मात्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. सत्तेत असताना-नसताना भूमिका बदलणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला मान्य नाही, असंही पंकजा मुंडे यांनी ठणकावून सांगितलं.
हेही वाचा : मातोश्रीशी एकनिष्ठ असलेला आमदार म्हणाला, ‘उद्धव ठाकरेंच्या पत्राने शंभर हत्तीचं बळ मिळालं’
हेही वाचा : ओबीसी आरक्षणाची सुनावणी लांबणीवर, नव्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण निर्देश
[ad_2]
Source link