मुंबईत धक्कादायक प्रकार! मुलुंडमध्ये तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, गुप्तांगावर मेणबत्तीचे चटके अन्…


मुंबई : मुंबईला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या मुलुंड परिसरात एका ३३ वर्षीय व्यक्तीवर अनैसर्गिक अत्याचार करून त्याला गुप्तांगावर मेणबत्तीचे चटके दिल्याची घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात सुरेश म्हस्के या ३४ वर्षीय आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी म्हस्केने तक्रारदाराकडून काही पैसे उधारीवर घेतले होते. हे पैसे देण्यास आरोपी टाळाटाळ करत होता. मात्र, वारंवार तक्रारदाराने पैशासाठी तगादा लावत असल्याने राग अनावर झालेल्या आरोपीने ६ जुलै रोजी २ वा तक्रारदाराला मुलुंड कॉलनी, हिंदुस्तान चौक समोरील गोडाऊनमध्ये गाठून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले.

आळंदी: भाजपच्या माजी नगराध्यक्षांच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या, धक्कादायक कारण समोर
विकृत नराधम ऐवढ्यावरच न थांबता आरोपीने त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पाईप घालून मेणबत्तीने चटके देत क्रूर कृत्य केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तक्रारदारावर सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण असून पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी म्हस्केवर ३७७, ३२६, ५०४,५०६ भादवी कलमांतर्गत मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे मुंबईत आता पोलिसांचा धाक उरला नाही का? असाच प्रश्न समोर येतो.

Maharashtra Weather: राज्यात मुंबईला ऑरेंज तर ५ जिल्यांना रेड अलर्ट, ‘या’ तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशाराSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish