जनता दलाचे रायगड जिल्हा सरचिटणीस विजय खारकर यांच्या प्रयत्नाने अखेर वासांबे ग्रामपंचायत कामाला लागली,बिल्डरच्या दबावाखाली बुझवलेला नैसर्गिक नाला पुन्हा खुला केला.

रसायनी : रसायनी परिसरात दांड आपटा रोड वर अपूर्वा हॉटेल जवळील मुख्य रस्ता सतत खराब होत होता . बाजूच्या गतारातील सर्व पाणी हे रस्त्यावर येत होते. त्यामुळे सर्वच गाड्यांची या रस्तावरून गाडी चालवायची मोठीच गाळण उडत आहे. सतत खराब होणारा रस्ता हा का खराब होत आहे . याचे मूळ कारण कोणी शोधले नाही , जनता दलाचे जिल्हा सरचिटणीस विजय खारकर यांनी त्या जागेची पाहणी करून पाणी रस्त्यावर येण्याचे कारण शोधून काढले .

शेजारील असलेल्या बिल्डर , ग्रामपंचायत व ग्रामपंचायतीचे इंजिनिअर यांनी संगनमत करून जिल्हा परिषद फंडातून बिल्डर च्या बिल्डिंग पर्यंत जाण्यासाठी सिमेंट काँक्रीट चा रस्ता बनवला. परंतु त्या रस्त्याच्या सुरुवातीलाच असलेला नैसर्गिक नाला हा ग्रामपंचायतीने बिल्डर साठी बुजवला होता.

त्यामुळे त्या नाल्यातील गटाराचे पाणी रस्त्यावर येत होते . मागील वर्षी विजय खारकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधून रस्ता खराब होण्याचे कारण समजावून सांगितले व त्यासंदर्भात पत्रव्यवहार केला.
सार्वजनिक बांधकाम विभागाने वासांबे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक सरपंच याना पत्र देऊन सदरील गटाराचे पाणी हे रस्त्यावर येणार नाही या साठी उपाययोजना कार्यालयास सांगितल्या होत्या . परंतु सततचे दुर्लक्ष करून ग्रामपंचायतीने त्या पत्रांना केराची टोपली दाखवली होती.


ग्रामपंचायतीने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे या वर्षी दांड आपटा रस्ता खराब होण्यास वासांबे ग्रामपंचायत जबाबदार आहे .सार्वजनिक बांधकाम विभागात जनता दलाचे जिल्हा सरचिटणीस विजय खारकर यांनी मागच्या वर्षी पत्रव्यवहार केला होता. आणि या वर्षी मे महिन्यात रस्ता दुरुस्त केला होता .परंतु रस्ता पुन्हा खराब झाल्याने पुढील 5ते 6 महिने नागरिकांना या खड्ड्यांचा सामना करावा लागेल या बाबत विजय खारकर यांनी नाराजी व्यक्त केली.


परंतु आता जनता दलाचे रायगड जिल्हा सरचिटणीस विजय खारकर यांच्या प्रयत्नाने अखेर वासांबे ग्रामपंचायत कामाला लागली,बिल्डरच्या दबावाखाली बुझवलेला नैसर्गिक नाला पुन्हा खुला केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish