सांगली: कृष्णाकाठी मृत माशांचा खच, मासे घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड


सांगली : सांगलीच्या कृष्णा नदीत गेल्या दोन दिवसांपासून माशांच्या मृत्यूचा थैमान सुरूच आहे. नदीकाठी हजारो मृत माशांचा खच जागोजागी पाहायला मिळत आहे. छोट्या-मोठ्या माशांपासून अगदी भले मोठे मासे नदीच्या पात्रात मृत आणि तडफडणाऱ्या अवस्थेत पाहायला मिळत आहेत. प्रदूषण महामंडळाने देखील याची गंभीर दखल घेत नदीपात्रातल्या पाण्याचे नमुने घेतले आहेत. तर कारखान्यातून सोडण्यात आलेल्या रासायनिक मिश्रीत पाण्याने की अन्य कशाने या माशांचा मृत्यू झाला आहे. त्याचा शोध सुरू झाला आहे. पण या लाखो माशांचे मारेकरी कोण? हा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

संततधार पाऊस, कोयना धरणातून सोडण्यात आलेले पाणी त्यामुळे कृष्णा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. पाण्याची पातळी दररोज वाढत आहे. लालसर असणाऱ्या या पाण्यात मात्र आता लाखो मास्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पलूस तालुक्यातल्या आमणापुर पासून सांगलीच्या हरिपूर संगमा पर्यंत जागोजागी मृत माशांचा खर्च पाहायला मिळत आहे. तर हजारो मासे हे अजूनही या कृष्णाच्या पात्रात तडफडत असल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे. हे मासे घेऊन जाण्यासाठी नदीकाठी झुंबड देखील उडत आहे.

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ९२ नगरपरिषदा, ४ नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित

गेल्या काही वर्षांमध्ये माशांच्या मृत्यूचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. या कृष्णाकाठी असणाऱ्या साखर कारखान्यांमधून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या मिश्रित पाण्यामुळे माशांच्या मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता. मात्र, तसे कोणतेच पुरावे मिळाले नसल्याने या कारखान्यांच्यावर कारवाई झाली नाही. पण माशांच्या मृत्यूचे प्रकार वाढतच आहेत. नदीच्या पात्रामध्ये पाण्याची पातळी वाढली की, अशा प्रकारे माशांच्या मृत्यूचे प्रकार समोर येतात. आता देखील पाण्याची पातळी वाढलेली असून लाखो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. हा प्रकार होत असताना प्रदूषण महामंडळ काय करत आहे? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

या घटनेनंतर प्रदूषण महामंडळाने याची गंभीर दाखल घेतली आहे. प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कृष्णा नदीच्या पात्रामध्ये जाऊन याबाबतची पाहणी देखील केलेली आहे. प्राथमिक तपासामध्ये या ठिकाणी कारखान्यामधून सोडण्यात येणाऱ्या मिश्रीत पाण्याचा कोणताही भाग किंवा केमिकल या पाण्यात आढळलं नाही. त्याचबरोबर जिथे कारखाने आहेत तिथून या नदीपात्रात ओढ्याद्वारे पाणी सोडले गेले का? याचीही तपासणी केली आहे. मात्र, असा कोणताच प्रकार समोर आला नसल्याचे प्रदूषण महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर हे मासे कोणत्या कारणाने मृत्यूमुखी पडले असावेत याबाबतचा अहवाल मत्स्य विभागाकडून मागविण्यात आला आहे. त्याच बरोबर कृष्णा नदीच्या पाण्याचे नमुने देखील घेण्यात आले असून ते चिपळूण या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यावर आणखी गोष्टी स्पष्ट होतील, असं महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे यांनी सांगितला आहे.

प्रदूषण महामंडळाकडून प्राथमिक तपासात कारखान्याचा कोणतही पाणी नदीपात्रात मिसळलं नसल्याचा स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या माशांचे मारेकरी कोण? या माशांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. त्यामुळे पाणी तपासणी आणि मत्स्य विभागाच्या अहवालानंतर याचे कारण समोर येणार आहे. पण वारंवार माशांच्या मृत्यूच्या घडणाऱ्या घटना पाहता त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. अन्यथा कृष्णानदी पात्रातले जलचर कायमचे नष्ट होतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

‘भरतीच्या वेळी मुंबईच्या किनाऱ्यावर धडकल्या मोठ्या लाटा’Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish