बॉलिवूडचा हा लोकप्रिय खलनायक सध्या काय करतोय? Video पाहून तुम्हाला होईल बॅगपॅक करण्याची इच्छा


Ashish Vidyarthi Food Vlogs: ‘कहो ना.. प्यार है’, ‘बर्फी’, ‘वास्तव’, ‘बेगम जान’ या सिनेमात भूमिका करणारे आशिष विद्यार्थी आठवतायंत का? बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. सध्या आशिष एक अनोखा छंद जोपासत आहेत…

 

मुंबई: बॉलिवुडमध्ये ज्यांनी विविध सिनेमात खलनायक साकारला ते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi Food Vlogs) त्यांच्या अनोख्या भूमिकांसाठी ओळखले जातात. बॉलिवूडच नव्हे तर दाक्षिणात्य सिनेमामध्येही त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आशिष विद्यार्थी यांचे नाव एखाद्या सिनेमामुळे नाही तर खाण्याच्या आवडीमुळे चर्चेत आले आहे. होय! आशिष सध्या स्वत:चा फुड व्लॉग्स चालवत आहेत. भारतासारख्या प्रचंड खाद्यवैविध्य असलेल्या देशात त्यांची भटकंती सुरू आहे. देशातील विविध भागात ते स्ट्रीट फुडची चव चाखत त्यांचे अनुभव Vlog च्या माध्यमातून मांडत आहे.

हे वाचा-OTT वर मनोरंजनाची पर्वणी; वीकेंडला पाहायला मिळणार भरपूर ॲक्शन आणि थ्रिलर

विद्यार्थी यांनी Koo या मायक्रोब्लॉगिंग साइटवर त्यांचे व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या या व्हिडिओंवर लाइक्स आणि कमेंट्स येत असून त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचं कौतुकही चाहते करत आहेत. भारतभर फिरताना विविध चवी चाखत विद्यार्थी नुकतेच हिमाचल प्रदेशमध्ये पोहोचले होते. हिमाचलमध्ये त्यांनी पॅराग्लायडिंग करतानाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यांचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ नक्कीच ट्रॅव्हल गोल्स देणारे आहेत.

हिमाचल प्रदेशमधून त्यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केलाया. त्यांच्या मित्रांनी त्यांच्यासाठी खास कानपूरहून प्रेमाने आणलेले लाडू खातानाचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. ‘ऐसा कोई सगा नहीं, जिसको हमने ठगा नही’, अशी मिश्कील टिप्पणी करत त्यांनी या व्हिडिओची सुरुवात केली आहे. हे ‘ठग्गू के लड्डू’ खाताना आशिष त्यांचे भरभरून कौतुक करत आहेत. ते सांगतात, ‘१९७५ मध्ये पहिल्यांदा मी हे लाडू खाल्ले होते. अजूनही यांची चव तशीच आहे. कमी गोड आणि तब्येतीला चांगले असे हे लाडू आहेत. हे खाऊन अशक्तपणा दूर होतो. चिअर्स!’

हे वाचा-पडद्यावरच्या मिसेस मुख्यमंत्री अमृता धोंगडेनं साधला खास योगायोग, सोशल मीडियावर चर्चा

विद्यार्थी दीर्घ काळापासून खाद्यभ्रमंती करत आहेत. भारतभरातील खाद्यवैविध्या मनापासून चाखत चवींना दिलखुलास दाद देणे, त्याबद्दल चाहत्यांना माहिती देणे हा या प्रवासामागचा हेतू असल्याचे विद्यार्थी सांगतात. विशेषत: गाव-शहरांमधील स्ट्रीट फुड ते चाखत आहेत. याआधी मुंबईतील वडापाव आणि चहाची चव चाखत मनापासून कौतुक करणारा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला होता. मुंबईमध्ये त्यांनी गोरेगावची मिसळही चाखली होती, त्यांनी इथलाही व्हिडिओ शेअर केलाय.

बेगुसरायच्या एका ठेल्यावर त्यांनी कचौडी-सब्जी आणि जिलेबी खाताना व्लॉग बनवला होता. सोबतच काही काळापूर्वी ते चेन्नइच्या रायर्स मेसमध्ये सांबार-वडा, बंगालमध्ये घुगनी आणि सूरतमध्ये सूरती लोचो हा पदार्थ खातानाचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला होता.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL NetworkSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish