अनुष्काचा सिनेमा १५ वेळा पाहिला, डोक्यात एकच खूळ, शेवटी २० लीटर पेट्रोल अंगावर ओतून पेटवलं


बंगळुरु: साऊथची सुपरस्टार अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा अरुंधती हा चित्रपट पाहून एका २३ वर्षीय तरुणाने अत्यंत भयानक पद्धतीने आत्महत्या केली आहे. ही घटना कर्नाटकातील टुमकारू जिल्ह्यातील आहे. जिथे हा तरुण अरुंधती चित्रपटाची कॉपी करत होता. अरुंधती हा एक तेलुगू हॉरर चित्रपट आहे. जो या तरुणांने तब्बल १५ वेळा पाहिला. तरुणावरचा हा चित्रपट पाहून अत्यंत वाईट परिणाम झाला. या चित्रपटाच्या नादात त्याने अकरावीनंतरचे शिक्षणही सोडले. रेणुका प्रसाद असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की तो अभ्यासात खूप हुशार होता आणि नेहमी त्याच्या वर्गात पहिला क्रमांक पटकवायचा.

त्याला या चित्रपटाचे इतके व्यसन लागले की त्याने आपले शिक्षणही सोडले. घरच्यांनी त्याला चित्रपट पाहण्यास मनाई देखील केली. पण, त्याने ऐकलं नाही. हा तरुण त्याच्या कुटुंबीयांशी चित्रपटाची कॉपी करण्याबाबत बोलायचा. मात्र, घरच्यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला.

हेही वाचा –१० रुपयांचं नूडल्स चोरणाऱ्या लहान मुलांना अघोरी शिक्षा, वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

२० लीटर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले

तरुणाने चित्रपटातील एक दृश्य कॉपी करण्याचा प्रयत्न केला. चित्रपटाच्या नायकाप्रमाणेच रेणुका प्रसादने बुधवारी गावाच्या बाहेरील भागात सुमारे २० लीटर पेट्रोल अंगावर ओतलं आणि स्वत:ला पेटवून घेतलं. रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांनी त्याला जळत असलेल्या अवस्थेत पाहिलं आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो जवळपास ६० टक्के भाजला होता. उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी कोडिगेनहल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. रेणुका प्रसाद याच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा –अमरावतीत भरचौकात गोळीबार, पण निशाणा चुकला, १३ वर्षीय विद्यार्थिनी थेट रुग्णालयात

त्याला पुनर्जन्म घ्यायचा होता

त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने चांगला अभ्यास करावा आणि चांगले करिअर करावे अशी त्यांची इच्छा होती. दुर्दैवाने सिनेमाच्या व्यसनाने त्याचा जीव घेतला. तेलुगू सुपरहिट चित्रपट ‘अरुंधती’मध्ये अभिनेत्री स्वतःच्या इच्छेनुसार मरते आणि शत्रूचा बदला घेण्यासाठी तिचा पुनर्जन्म होतो. या चित्रपटापासून प्रेरित होऊन रेणुका प्रसाद याने त्याच्या इच्छेनुसार स्वत:ला जाळले, कारण त्यालाही पुनर्जन्म घ्यायचा होता.

हेही वाचा –धक्कादायक! नवविवाहित महिला पोलिसाचा गळफास, पुण्याच्या हॉटेलमध्ये मृतदेह आढळला

तुरुंगातून सुटकेचा जल्लोष भोवला; सहा जणांवर गुन्हा दाखल

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish