पाण्याच्या टाकीत कबुतरं मेली, पाणीपुरवठा मंत्र्यांच्या मतदारसंघात दूषित पाण्याचा पुरवठा


जळगाव : मंत्री गुलाबराव पाटील यांना रविवारी पाणीपुरवठा खातं मिळालं. दुसरीकडे याच पाणीपुरवठा मंत्र्यांच्याच धरणगाव मतदारसंघात दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचा प्रकार समोर स्वातंत्र्यदिनी समोर आला आहे. पिंपळे गावाला पाणीपुरवठा होत असलेल्या पाण्याच्या टाकीत आठ ते दहा मेलेली कबूतरं आढळून आली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अशाच पद्धतीचा दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली आहे.

धरणगाव तालुक्यातील पिंपळे या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत मेलेले कबुतर आढळून आल्यामुळे प्रचंड गावात प्रचंड रोष आहे. तीन-चार दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा सुरू आहे. यामुळे गावातील काही तरुण पाण्याच्या टाकीवर चढले आणि त्यानंतर हा किळसवाना प्रकार समोर आला.

तालुक्यातील पिंपळे या गावात मागील तीन-चार दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा सुरू होता. त्यामुळे गावातील काही तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून नेमका काय प्रकार आहे?, हे बघण्याचे ठरवले. त्यानुसार दोन तरुण पाण्याच्या टाकीवर चढले. परंतू पाण्यात डोकावून बघताच त्यांना धक्का बसला. कारण पाण्याच्या टाकीत चक्क अनेक कबुतर मृतावस्थेत तरंगत होते. पाण्यात सर्वत्र कबुतरांचे पंख पसरलेले होते. या तरुणांनी पाण्यातील कबुतर काढून फेकले आहेत. परंतू आता टाकी स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे गावात असंतोषाची लाट पसरली आहे.

आधी जे खातं होतं तेच…, खातेवाटपानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

पिंपळे हे गाव साधारण ३ हजार लोकवस्तीचे आहे. तर पाण्याच्या टाकीची क्षमता १० हजार लिटरची असल्याचे कळते. देशात एकीकडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होतोय. तर दुसरीकडे अद्यापही ग्रामीण भागात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायम आहे. पाण्याची टाकी टीसीएल पावडर टाकून स्वच्छ धुण्यात आली आहे. रात्री टाकीवर कबुतर बसतात. त्यातील एक कबुतर पडले असावे, अशी माहिती पिंपळे गावचे ग्रामसेवक सोनावणे यांनी दिली.

मंत्री गुलाबराव पाटलांचे भर पावसात ध्वजारोहण, पोलिसांचीही पावसातच सलामीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish