सहा महिन्यांपासून मुलगी बेपत्ता, पोलीस शोध घेण्यात असमर्थ, दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न


लातूर: देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राष्ट्रध्वज फडकवून मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आज लातुरात एक धक्कादायक प्रकार घडला. अपहरण झालेल्या आपल्या मुलीचा शोध लागत नसल्याने हताश झालेल्या शेख दाम्पत्याने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थेट आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. शेख दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील तुरुकवाडी येथील एका १८ वर्षीय मुलीला २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गावातीलच एका तरूणाने पळवून नेल्याचा आरोप करत त्या मुलीची आई रब्बाना शेख यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, अद्यापही मुलीचा शोध लागला नाही. त्यामुळे मुलीचे काही बरे वाईट तर करण्यात आले नाही ना अशी भीती रब्बानी शेख यांना वाटत आहे. त्यामुळे माझ्या मुलीचा शोध लावण्यात यावा, अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी लातूर येथील जिल्हा पोलीस मुख्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी १० ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिला होता.

हेही वाचा –लातूरमध्ये थरारक घटना; चारित्र्यावर संशय घेत चिरला पत्नीचा गळा, दोघांची प्रकृती गंभीर

मात्र, तरीही पोलिसांनी या प्रकरणी तातडीने पावले उचलली नसल्याचा आरोप करत निराश झालेल्या शेख दाम्पत्याने अखेर टोकाचे पाऊल उचलत लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ध्वजारोहणासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ हस्तक्षेप केला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा –आपल्याकडे अगोदरच खूप प्रकारची आरक्षणं , स्त्रियांनी स्वत:च्या मेहनतीवर मंत्री व्हावं: अमृता फडणवीस

शिरुर अनंतपाळ पंचायत समितीत वाहन चालक पदावर नोकरी करीत असलेला राजकुमार डोंगरे, राम डोंगरे, आकाश डोंगरे आणि जनाबाई डोंगरे या चौघांनी मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या आईने दिली. त्यानंतर सदरचे डोंगर कुटुंब गाव सोडून दोन महिने गायब झाले. नंतर राजकुमार हा नोकरीवर रुजू झाला. त्यास पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी केली, पण मुलीचा अद्यापी पत्ता लागलेला नाही. या दाम्पत्याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे

हेही वाचा –खातेवाटपावरून शिंदे गटात मोठा असंतोष? ३ कॅबिनेट मंत्री नाराज असल्याची माहिती

आमच्याकडे घर नाही, पण खूप आनंद…; पालावरच्या नागरिकांनी आपल्या झोपड्यांवर तिरंगा फडकवलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish