Vande Mataram : ना ‘हॅलो’ बोलणार, ना ‘वंदे मातरम्’, भुजबळांनी ठरवलं फोन उचलताच काय बोलायचं


नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला तर ते जय महाराष्ट्र बोलतात, मी वंदे मातरम् म्हणणार नाही, मी जय महाराष्ट्र म्हणेन, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना फोन उचलल्यावर वंदे मातरम् म्हणण्याचे फर्मान काढले आहे. त्यावर भुजबळांनी उत्तर दिलं.

मंत्री झाल्यावर आदेश काढला, या निर्णयात वाईट वाटण्यासारखं काही नाही. काही जण ‘जय हिंद’ बोलतात, काही ‘जय महाराष्ट्र’ बोलतात, आमचे पोलीस बांधव फोन केल्यावर जय हिंद म्हणतात, शिवसेनेचे लोक जय महाराष्ट्र म्हणतात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला तर ते जय महाराष्ट्र बोलतात. आता शिंदेंनी मुनगंटीवारांना विचारावं, की फोन केल्यावर काय म्हणायचं? आपण ज्या ऑर्डर काढतो त्याचं भान ठेवायला हवं. मी वंदे मातरम् म्हणणार नाही, मी जय महाराष्ट्र म्हणेन. कायद्याने असं कुणावर बंधन घालणं योग्य नाही. लोकांच्या आवडी निवडीनुसार ते बोलतात, असं भुजबळ म्हणाले.

चांगली गोष्ट आहे खातेवाटप झालं, कोणते प्रश्न कुणाकडे मांडावं समजत नव्हतं, विधानसभेत आम्ही प्रश्न मांडू, अर्ध्यापेक्षा कमी मंत्री आहेत, परत बदल होतील. २४ खाती अजून वाटप करणे बाकी आहे त्यात होईल काही, मुख्यमंत्री सगळ्या खात्यांचा प्रमुख असतो. आम्ही सत्तेसाठी आलो नाही असं ते आगोदर बोलत होते, मग आता का ओरड करता आहात? असा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला.

हेही वाचा : आधी जे खातं होतं तेच…, खातेवाटपानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

गिरीश महाजन यांना जिल्ह्याचे प्रश्न माहीत आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना काय सल्ला देणार. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत, त्याचा फायदा नाशिकला करून घ्यावा, असंही भुजबळ म्हणाले.

हेही वाचा : खातेवाटपावरून शिंदे गटात मोठा असंतोष? ३ कॅबिनेट मंत्री नाराज असल्याची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणात सगळ्यांना बरोबर घ्या हे बोलले त्याचं मी स्वागत करतो, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घ्यायला हवं, मात्र त्यांच लोकांनी त्याची अंमलबजावणी करावी, गांधी घराण्याबद्दल बोलत असतील, तर राजीव गांधी यांचं बलिदान विसरता येणार नाही, आज जे मंत्री नेते दिसत आहेत, त्यांना घराणेशाहीचा इतिहास आहे. यांच्या सरकारमध्ये देखील घराणेशाही आहे त्यांनी बघावी, असंही भुजबळ म्हणाले.

हेही वाचा : आपल्याकडे अगोदरच खूप प्रकारची आरक्षणं , स्त्रियांनी स्वत:च्या मेहनतीवर मंत्री व्हावं: अमृता फडणवीसSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish