आधी जे खातं होतं तेच…, खातेवाटपानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया


जळगाव : मंत्रिमंडळातील खातेवाटपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप तुपाशी तर शिंदे गट उपाशी, अशी टीका सामनामधून केली. यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोला लगावला आहे. उंदराला सापडली चिंधी… इकडे ठेवू का तिकडे ठेवू… या शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत जोरदार टोला लगावला आहे. खातेवाटपानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहणानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

खाते कुणाला कोणतं दिल यापेक्षा सर्व खात्यांवर सामूहिक जबाबदारी ही मंत्र्याची असते. मी जरी पाणीपुरवठा खात्याचा मंत्री असलो तरी माझी इतर खात्यांवर जबाबदारी आहे. प्रत्येक खात्याच्या प्रत्येक विभागाचे काम करण्याची जबाबदारी ही मंत्र्याची असते, असे यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले. खाते तर वाटप करताना थोडं इकडे तिकडे झालं असेल. मात्र उंदराला सापडली चिंधी, इकडे ठेवू की तिकडे ठेवू, असं म्हणत प्रत्यक्ष नाव न घेता गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

खातेवाटपात जे खाते मिळालं आहे त्यावर समाधानी आहात का? असा प्रश्न गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आला. मला आधी जे खातं होत तेचं पाणीपुरवठा खातं मिळालं आहे. माझे पूर्वीचेच खाते मला मिळाले, त्यामुळे आनंद झाला. माझी सेकंड इनिंग सुरू होत असल्याने जलजीवन मिशन अंतर्गत ३४ हजार गावांना पाणी पाजण्याचा एक मोठा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे. आणि गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे काम करण्यात येणार असल्याने या गोष्टीचा आनंद आहे. मिळालेल्या खात्याने निश्चितच समाधानी आहे, गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा… जिसमे मिला है उस जैसा…अशा गाण्याच्या ओळी म्हणून त्यांनी जे खातं मिळालं त्याचा आनंदही व्यक्त केला.

मंत्री गुलाबराव पाटलांचे भर पावसात ध्वजारोहण, पोलिसांचीही पावसातच सलामी

खातेवाटपात भाजपचा वरचष्मा दिसून येतो? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. चष्मा तर मी पण घातला आहे, असं मिश्किल उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं. यावर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

ध्वजारोहण सोहळ्यात महिलेचा धक्कादायक प्रकार, स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेतलंSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish