sachin pilot : राजस्थानमध्येही नेतृत्वबदल? सचिन पायलटसोबत राहुल, प्रियांका गांधींची बैठक


नवी दिल्लीः पंजाबमध्ये नेतृत्व बदल केल्यानंतर काँग्रेस हायकमांडच्या रडारवर आता राजस्थान ( sachin pilot meets rahul and priyanka gandhi ) असल्याचं दिसतंय. राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी आज गेल्या काही दिवसांत दुसऱ्यांदा काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांची भेट घेतली. सचिन पायलटना गुजरातमध्ये संघटनात्मक पद मिळण्याची शक्यता आहे. पायलट आणि गांधी परिवारात त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी चर्चा झाली. शेजारच्या पंजाबमध्ये काँग्रेस हायकमांडने नेतृत्व बदल करून कलह मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आहे आणि ७० वर्षांचे अशोक गहलोत हे मुख्यमंत्री आहेत. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. काँग्रेस हायकमांडने तरुण नेतृत्व दिलं. यामुळे राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या आपेक्षा वाढणं साहजिकच आहे. पण ४४ वर्षीय सचिन पायलट यांनी काँग्रेसच्या गुजरात मोहीमेची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली आहे का? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दुसरीकडे पायलट यांच्या निकटवर्तीयांचीही अजून मंत्रिमंडळात वर्णी लागलेली नाही.

गुजरातमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. यामुळे गुजरात निवडणुकीची जबाबदारी सचिन पायलट यांच्याकडे देण्याचा काँग्रेसचा विचार आहे का? अशोक गहलोत यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी होणार आहे? हे काही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

“Mr 56″ चीनला घाबरतात”, PM मोदींवर राहुल गांधींचा निशाणा

सचिन पायलट यांची राहुल गांधींसोबत यापूर्वी १७ सप्टेंबरला बैठक झाली होती. या बैठकीत राजस्थानमध्ये काँग्रेसला अधिक बळकट करण्यासह सचिन पायलट यांच्या पुढील भूमिकेवर दीर्घ चर्चा झाली.

amarinder singh : ‘काँग्रेसमध्ये रागाला स्थान नाही, पण अपमान आणि छळासाठी आहे?’Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish