अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचे कटकारस्थान सुरू; नवाब मलिकांचा धक्कादायक आरोप

अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचे कटकारस्थान सुरू; नवाब मलिकांचा धक्कादायक आरोप


हायलाइट्स:

  • नवाब मलिक यांची पत्रकार परिषद
  • नवाब मलिकांनी केला धक्कादायक आरोप
  • खोटी तक्रार करत असल्याचा दावा

मुंबईः ‘अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात खोटी तक्रार करुन कारवाई सुरू झाली. तसंच, माझ्याविरोधात काही केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी षडयंत्र रचत आहेत. माझ्या विरोधात स्वतः काही अधिकारी लोकांना व्हॉटस्अॅपद्वारे मसुदा तयार करुन पाठवतात आणि त्यांच्या ई- मेलच्या माध्यमातून माझ्या विरोधात खोटी तक्रार करायला भाग पाडतात. राज्यातील एका मंत्र्याविरोधात खोटी तक्रार करायला भाग पाडतात याचे माझ्याकडे पुरावे आहेत. खोटी तक्रार करुन मला अडकवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा कामाला लागली आहे,’ असा धक्कादायक आरोप नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी शुक्रवारी एक ट्विट करत काही लोकं माझ्या घरावर व शाळेवर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला होता. तसंच, काही फोटोही ट्वीट केले आहेत. यापार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत या प्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच, ‘माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करुन मला अडकवण्याचे प्रयत्न सुरु असून केंद्रीय तपास यंत्रणाच्या मदतीने हे सर्व सुरू आहे’, असा धक्कदायक आरोप त्यांनी केला आहे. याबाबतीह मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

वाचाः १५ लाखांची रोकड घेऊन व्यापारी घरी निघाला पण वाटेत ५ तरुणांनी अडकले; अन्

‘एक अनिल देशमुख झाले तसे अनेक अनिल देशमुख होतील हा त्यांचा गैरसमज आहे. पण आम्ही हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही योग्य ती कारवाई करु,’ असा इशारा नवाब मलिक यांनी केला आहे. ‘जे माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहे. त्यांचे पुरावे माझ्याकडे आले आहेत. खोटी तक्रार माझ्याविरोधात केली आहे. त्याचेही पुरावे माझ्याकडे आहेत. याबाबत मी पोलिसांकडे तक्रार करणार आहे,’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

वाचाः परमबीर सिंह यांची आठ तास चौकशी; जबाब नोंदवला, मिळाला ‘हा’ दिलासा!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish
%d bloggers like this: