IND v NZ : सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताला बसला मोठा धक्का, पाहा नेमकं घडलं तरी काय…

IND v NZ : सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताला बसला मोठा धक्का, पाहा नेमकं घडलं तरी काय…
IND v NZ : सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताला बसला मोठा धक्का, पाहा नेमकं घडलं तरी काय…


कानपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताला एक मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सामना सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघात चिंतेचे वातावरण होते.

नेमकं घडलं तरी काय, पाहा…दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता शतक झळकावले होते, त्यामुळे तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघ चिंतेत होता. पण त्याचवेळी भारतीय संघाला सामना सुरु होण्यापूर्वी अजून एक धक्का बसला. भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याच्या मानेला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्याचे समोर आले. त्यामुळे साहाला तिसऱ्या दिवशी यष्टीरक्षण करायला जमणार नव्हते. त्यामुळे राखीव यष्टीरक्षक केएस भरतला यावेळी मैदानात उतरावे लागले. या मालिकेसाठी रिषभ पंतने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साहाकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण साहा सध्याच्या घडीला संघाबाहेर असल्याचे पाहायला मिळत आहे. तिसऱ्या दिवशी जेव्हा साहा मैदानात उतरला नाही त्यावेळी चाहत्यांना धक्का बसला होता. पण त्यानंतर बीसीसीआयने याबाबत अपडेट दिली आणि याबाबतची माहिती चाहत्यांना समजू शकली. साहाच्या दुखापतीवर उपचार सुरु आहेत. पण तो मैदानात उतरू शकणार की नाही, याबाबतची माहिती असून मिळू शकलेली नाही.

तिसऱ्या दिवशी भारताला पहिले यश मिळवून दिले ते आर. अश्विनने. तिसऱ्या दिवशी अश्विनने न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगला भरतकरवी झेलबाद केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले. यंगने यावेळी १५ चौकारांच्या जोरावर ८९ धावांची खेळी साकारली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने विकेट न गमावता १२९ धावा केल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ निर्णायक ठरणार होता. अश्विनने यावेळी भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन हा फलंदाजीला आला आहे. भारतासाठी सर्वात मोठा धोका हा केनकडून आहे. त्यामुळे या डावात न्यूझीलंडचा संघ किती धावा करतो आणि भारतीय संघ पहिल्या डावात आघाडी मिळवण्यात यशस्वी ठरतो का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish
%d bloggers like this: