उसाने भरलेली ट्रॉली घरावर कोसळली; आजीसह छोट्या नातीचा दुर्दैवी मृत्यू

हायलाइट्स:
- उसाने भरलेली ट्रॉली घरावर कोसळली
- ५५ वर्षीय आजीसह ८ वर्षांच्या नातीचा मृत्यू
- परभणीत घडली घटना
परभणी जिल्ह्यात सध्या ऊस काढणीला आल्याने शेतकऱ्यांच्या शेतातून मोठ्या प्रमाणात उसाची वाहतूक कारखान्याकडे केली जात आहे. ट्रॅक्टरच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून वाहतूक केली जाते. ट्रॅक्टर चालक ट्रॉली पेक्षा दुपटीने ऊस भरून वाहतूक करत असतात त्यामुळं अनेक अपघात घडत आहेत. पाथरीतील बाभळगावातही अशीच घटना घडली आहे. ट्रॉली घरावर कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
वाचाः क्षुल्लक कारणांवरुन झालेला वाद टोकाला पोहचला; पत्नीने केले धक्कादायक कृत्य
पारुबाई पवार आणि त्यांची नात शिवानी जाधव या दोघी आपल्या घरासमोरील चारपाईवर बसले होते. त्यावेळी घरासमोरून येत असलेल्या भवरघाव ट्रॅक्टर अचानक पलटी झाला. ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळं त्यातील उसाचा भारा खाली कोसळला आणि उसाच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने दोघींचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तसंच, त्याच्या सोबतच पलंगावर बसलेल्या पूजा पवार ह्या पलंगाच्या बाजूला झोपलेल्या असल्याने त्या थोडक्यात बचावल्या आहेत.
वाचाः ‘बाय वन, गेट वन फ्री’ची ऑफर पडली महागात; ४९ रुपयांची थाळी पडली ९० हजारात
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे उसाच्या अवैध आणि क्षमतेपेक्षा आधीक वाहतुकीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला जात आहे. उपप्रादेशिक अधिकारी अशा वाहतूकीकडे डोळेझाक का करत आहेत असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
वाचाः भयंकर! जेवणात वांग्याची भाजी न केल्याने राग अनावर; पोटच्या मुलाने केली आईची हत्या