Sanjay Dutt: संजय दत्तला मिळाला आजवरचा सर्वात मोठा सन्मान; दिसणार ‘या’ भूमिकेत

Sanjay Dutt: संजय दत्तला मिळाला आजवरचा सर्वात मोठा सन्मान; दिसणार ‘या’ भूमिकेत


हायलाइट्स:

  • अभिनेता संजय दत्त आता दिसणार नव्या भूमिकेत.
  • अरुणाचल प्रदेशचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती.
  • मुख्यमंत्री पेमा खांडू यांचे संजयने मानले आभार.

ईटानगर: बॉलीवूड स्टार संजय दत्त याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याचा पूर्वेतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, तो खडतर काळ सोडला तर कारागृहातून सुटल्यानंतर संजय दत्तमध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळालेले आहेत. हाच बदल त्याच्या पथ्यावर पडला असून एक मोठा सन्मान आता संजय दत्तला मिळाला आहे. एका राज्याचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून संजय भूमिका निभावणार आहे. ( Sanjay Dutt Arunanchal Pradesh Brand Ambassador )

वाचा:ओमिक्रॉनवर कोव्हिशील्ड किती प्रभावी?; पूनावाला यांनी दिली आनंदाची बातमी

संजय दत्तने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. संजयला अरुणाचल प्रदेश या राज्याचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अरुणाचलला ५० वर्षे पूर्ण होत असून हे औचित्य साधत राज्याच्या ब्रँडिंगची जबाबदारी संजय दत्तवर सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीसाठी संजयने अरुणाचल प्रदेश सरकारचे आभार मानले आहेत. याबाबत संजय दत्तने इन्स्टाग्रामावर खास पोस्ट टाकली आहे.

वाचा: ओमिक्रॉनबाबत दिलासादायक बातमी; ‘ही’ लस ठरणार प्रभावी

संजय दत्त हा आता अरुणाचल प्रदेशचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असणार आहे तर चित्रपट निर्माता राहुल मित्रा याची ब्रँड सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संजयने राहुल याच्यासोबतचा अरुणाचलमधीलच एक फोटो पोस्ट करत यावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अरुणाचल प्रदेशचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून सन्मान मिळणं ही खूप मोठी बाब आहे. एक भारतीय असण्याचा मला नेहमीच अभिमान राहिला आहे आणि आज झालेल्या या नियुक्तीने माझी छाती गर्वाने आणखी फुलली आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री पेमा खंडू आणि विधानसभा अध्यक्ष पसांग सोना दोर्जी यांना भेटण्याचा योग आला. माझा मित्र राहुल मित्रासोबत काम करायचे आहे आणि निश्चितच राज्य अग्रेसर व्हावे, पर्यटनवृद्धीतून प्रगती व्हावी, यासाठी आमचा हातभार असणार आहे, अशा भावना संजय दत्तने व्यक्त केल्या.

वाचा:स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत मोठी बातमी; मोदी सरकारने घेतली ‘ही’ भूमिका

मुख्यमंत्री खांडू यांनीही मुन्नाभाई असा उल्लेख करत संजय दत्त हा अरुणाचल प्रदेशसाठी परफेक्ट ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असल्याचे नमूद केले आहे. अरुणाचल प्रदेशला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने सरकार अनेक निर्णय घेत असून २० जानेवारी ते २० फेब्रुवारी असा महिनाभर चालणाऱ्या राज्य स्थापना दिन उत्सवाची घोषणाही खांडू यांनी यावेळी केली.

वाचा:उद्धव ठाकरे ममता बॅनर्जींना भेटणार नाहीत; राऊत यांनी सांगितले कारणSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: