जुन्या मोबाइलच्या बदल्यात भांडी देते असं सांगून तीन महिन्याच्या बाळाचं अपहरण
जुन्या मोबाइलच्या बदल्यात भांडी देते असं सांगून तीन महिन्याच्या बाळाचं अपहरण
जुन्या मोबाइलच्या बदल्यात भांडी देते असं सांगून तीन महिन्याच्या बाळाचं अपहरण
मुंबई : जुन्या मोबाईलच्या बदल्यात भांडी देतो असं सांगून महिलेला बेशुद्ध केलं आणि तिच्या तीन महिन्यांच्या बाळाचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना काळाचौकी परिसरात घडली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून अपहरण करणाऱ्या महिलेचा शोध घेण्यात येत आहे.
काळाचौकी परिसरात राहणाऱ्या सपना मगदूम या आपल्या घरी एकट्याच असताना, 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते 1 च्या सुमारास एक 30 ते 35 वर्षाची महिला आली. जुन्या मोबाइलच्या बदल्यात नवीन भांडी देण्याचा सांगून आरोपी महिलेने सपना मगदूम यांचा विश्वास संपादन केला. सपना मगदूम यांची तीन महिने पंधरा दिवसांची मुलगी वेदा मगदूम ही पलंगावर झोपली होती.
जुना मोबाईल आणण्यासाठी सपना मखदूम जेव्हा आतल्या रूममध्ये जात होत्या तेव्हा आरोपी महिला पाठी मागून आली आणि तिने बेशुद्ध करण्याचे औषध सपना यांच्या नाकाला लावून त्यांना बेशुद्ध केलं. पलंगावर झोपलेल्या तीन महिन्याच्या चिमुकलीला या महिलेने उचललं आणि आपल्या सोबत घेऊन पसार झाली.
सपना मगदूम  या जेव्हा शुद्धीवर आल्या तेव्हा  त्यांची लहान मुलगी वेदा पलंगावर नव्हती आणि जी महिला भांडी विकण्यासाठी आली होती तिने आपल्या  बाळाचं अपहरण केल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणात गुन्हा नोंदवला आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Mumbai: चार हजारांची व्हिस्की अन् खात्यातून तीन लाख गायब, अभिनेत्रीची ऑनलाईन फसवणूक
Mumbai Crime : फेसबुकवर दिसायची ‘ती’, समोर यायचा ‘तो’; नोकरी देतो सांगून तरुणांचा मोबाईल घेऊन काढायचा पळ
नागपुरात वृद्ध महिलेच्या खुनाचा उलगडा, पैशांसाठी नातवानेच आजीचा गळा कापला
Source link
Leave a Reply
Your email address will not be published.
en_USEnglish
%d bloggers like this: