चिंताजनक! मातोश्री वृद्धाश्रमात आणखी १७ जण करोना पॉझिटिव्ह; तीन दिवसांत ७९ बाधित

चिंताजनक! मातोश्री वृद्धाश्रमात आणखी १७ जण करोना पॉझिटिव्ह; तीन दिवसांत ७९ बाधित


ठाणे: सोरगाव येथील मातोश्री वृध्दाश्रमातील करोना बाधितांच्या एकूण १७ निकट सहवासितांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वी वृद्धाश्रातील सुमारे ६२ ज्येष्ठ नागरिकांना करोना संसर्ग झाल्याचे दोन आढळून आले होते. याचाच अर्थ तीन दिवसांमध्ये येथे एकूण ७९ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने वृद्धाश्रमात चिंतेचे वातावरण आहे. वृद्धाश्रमातील ६२ ज्येष्ठ नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेने त्यांच्या निकट सहवासितांची ही तपासणी (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) केली. ही माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दिली. हे सर्व रुग्ण लक्षणे विरहित असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. (another 17 people have tested covid positive at matoshri old age home in thane district)

क्लिक करा आणि वाचा- एकीकडे चिंता, दुसरीकडे दिलासा; पाहा, ‘अशी’ आहे राज्यात करोनाची ताजी स्थिती!

वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे नातेवाईक, केअरटेकर तसेच निकटसहवासित असे ५२ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये १७ जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामध्ये ४ ज्येष्ठ नागरिक असून १ महिला आणि अन्य १२ केअरटेकर आहेत, असेही डॉ. रेंघे यांनी सांगितले.

२७ नोव्हेंबर या दिवशी या वृद्धाश्रमातील एक रुग्ण खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर वृद्धाश्रमातील १०९ लोकांची अॅन्टीजन तपासणी केली असता ६१ लोक बाधित आढळले होते.

क्लिक करा आणि वाचा- ‘जय मराठा, जय बांगला’; ठाकरे-बॅनर्जी भेटीत नव्या राजकीय समीकरणाची चर्चा?
म्हणजेच १ आरटीपीसीआर आणि ६१ अन्टीजन असे एकूण ६२ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले. यात २५ महिला आणि ३७ पुरुषांचा समावेश आहे. तसेच या ६२ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ५५ वृद्ध, ५ स्टाफ आणि २ कुटुंबातील व्यक्ती आहेत. या रुग्णांमधील ६१ रुग्णांना इतर आजारही आहत. तसेच या आश्रमातील ३२ जणांना कोविडची लक्षणे दिसून आली होती. तर इतर ३० जणांना कोणतीही लक्षणे नव्हती.

स्टाफमधील कुटुंबातील २ व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या असून त्यात १ गरोदर माता आणि १ अडीच वर्षाची बालिका आहे.

क्लिक करा आणि वाचा- सीताराम कुंटेंना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला नाही; देबाशीष चक्रवर्ती राज्याचे नवे मुख्य सचिवSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: