Mumbai Rains: मुंबईकरांनो सावधान! IMDने जारी केला अलर्ट; दिला ‘हा’ इशारा

Mumbai Rains: मुंबईकरांनो सावधान! IMDने जारी केला अलर्ट; दिला ‘हा’ इशारा


हायलाइट्स:

  • हवामान विभागाकडून जारी केला गेला महत्त्वाचा अलर्ट.
  • मुंबई, पालघर, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता.
  • ओडिशा, आंध्र प्रदेशला बसणार चक्रीवादळाचा तडाखा.

नवी दिल्ली: पावसाळा संपला असला तरी महाराष्ट्रावरील पावसाचं संकट संपलेलं नसून हवामान विभागाने एक अलर्ट जारी करत मुंबईत बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. मुंबईसोबतच पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांनाही सतर्क करण्यात आले असून ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. ( Mumbai Rains Latest Breaking News )

वाचा:ओमिक्रॉनवर कोव्हिशील्ड किती प्रभावी?; पूनावाला यांनी दिली आनंदाची बातमी

हवामान विभागाने महाराष्ट्र व गुजरातला सतर्क केलं आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून जवळ अरबी समुद्रात पुढील २४ तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून त्याचा परिणाम म्हणून अनेक भागांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र व उत्तर कोकण भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून त्यात मुंबई , पालघर आणि ठाणे या पट्ट्यात सर्वाधिक पाऊस कोसळू शकतो, असे हवामान विभागाने नमूद केले आहे. गुरुवारी (२ डिसेंबर ) गुजरात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस कोसळेल, असेही हवामान विभागाने सांगितले.

वाचा:महाराष्ट्रावर घोंगावतंय ओमिक्रॉनचं संकट; आफ्रिकेतून आलेले ‘ते’ सहा प्रवासी…

अंदमानच्या समुद्रात पुढील १२ तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून त्यातून बंगालच्या खाडीत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हे वादळ त्यापुढील एक दोन दिवसांत आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्यांच्या किनारी धडकू शकतं, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

महत्त्वाचे…

– ओडिशाच्या अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागालाही पावसाचा तडाखा बसेल.

– उत्तर पूर्वेकडील राज्यांमध्ये अनेक भागांत ५ आणि ६ डिसेंबर रोजी मुसळधार पाऊस कोसळेल तर काही भागांत शिडकावा होईल.

– मुंबई, पालघर, ठाणे या जिल्ह्यांत बुधवारी मुसळधार पाऊस कोसळेल तर गुरुवारीही उत्तर मध्य महाराष्ट्रात काही भागांत जोरदार पाऊस कोसळू शकतो.

वाचा:स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत मोठी बातमी; मोदी सरकारने घेतली ‘ही’ भूमिकाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: