Narendra Modi: विमान प्रवासातही काम सुटेना, पंतप्रधान मोदींनी शेअर केला फोटो

[ad_1]

हायलाइट्स:

  • पंतप्रधान मोदी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर
  • विमानाप्रवासातही फायली आणि कागदपत्रं हातावेगळी केली
  • सोशल मीडियावर शेअर केला फोटो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. बुधवारी सकाळी ११.०० वाजल्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीहून अमेरिकेसाठी रवाना झाले. गुरुवारी रात्री जवळपास २.०० वाजता ते वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. या प्रवसादरम्यान त्यांनी आपल्या विमान प्रवासातले काही क्षण फोटोंच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंत पंतप्रधान मोदी काही फायलींसोबत दिसत आहेत.

‘दीर्घ विमान प्रवासाचा अर्थ काही कागदपत्रं आणि फाईलचं काम करण्याची संधीही असतो’ असं या फोटोंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटर हॅन्डलवर म्हटलं गेलंय.


vaccination record : PM मोदींच्या वाढदिवसाला मृतांनाही दिली गेली करोनाची लस?
brahmin community : ‘PM मोदींवरील चित्रपटातून ब्राह्मणांविरोधात विष कालवलं जातंय?’, माजी IPS अधिकाऱ्याचा सवाल
अमेरिकेसोबत नवे मैत्रिपर्व

अमेरिकेसोबत व्यापक वैश्विक रणनीतिक भागीदारी दृढ करण्याची, जपान आणि ऑस्ट्रेलिया या सामरिक सहकाऱ्यांसोबत संबंध भक्कम करण्याची, तसेच महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मुद्यांवरील सहकार्याला चालना देण्याची संधी या दौऱ्यात मिळेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे.

दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबरमध्ये केलेल्या ब्राझीलच्या दौऱ्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच मोठा परदेश दौरा ठरतोय. या वर्षाच्या सुरुवातीला मोदींनी यंदा २६-२७ मार्च रोजी शेजारी बांग्लादेशचा दौरा केला होता. अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी निवेदनाद्वारे आपल्या अमेरिका दौऱ्याचा तपशील दिला. ‘अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत आपण भारत-अमेरिका व्यापक वैश्विक रणनीतिक भागीदारीचा आढावा घेणार असून परस्पर हितांच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर विचारांची देवाणघेवाण करणार आहोत. उभय देशांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्याच्या संधींची माहिती घेण्यासाठी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचीही भेट घेण्यास मी उत्सुक आहे’, असं त्यांनी या निवेदनात म्हटलं होतं.

‘बायडन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यासोबत पहिल्या प्रत्यक्ष क्वाड शिखर परिषदेत सहभागी होणार आहे. मार्चमध्ये झालेल्या आभासी क्वाड शिखर परिषदेतील निष्कर्षांचा आढावा घेण्याची तसेच हिंद-प्रशांत क्षेत्राच्या संयुक्त दृष्टिकोनाच्या आधारे भविष्यातील प्राधान्य ओळखण्याची संधी या परिषदेत मिळणार आहे’, असंही त्यांनी यात म्हटलं होतं.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेला संबोधित केल्यानंतर मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा समारोप होईल. या आमसभेत करोना साथ, दहशतवादाला निपटण्याची आवश्यकता, हवामानबदल आणि इतर महत्त्वाच्या मुद्यांसह जागतिक आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्यात येईल, असं मोदी यांनी या निवेदनात म्हटलंय.

Shivraj Singh Chouhan: मुख्यमंत्री शिवराज दबावाखाली? दिल्लीत नेत्यांच्या भेटीगाठींचा सपाटा
Karnataka: चिमुरड्याच्या प्रवेशानं मंदिर ‘अशुद्ध’ झाल्याचा दावा, कुटुंबाकडून मागितला दंड

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *