Nagar panchayat Election 2021 LIVE : रायगड, रत्नागिरीतील नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदान, जाणून घ्या अपडेट्स


मुंबई/ रायगड/ रत्नागिरी: राज्यातील ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायत निवडणुकांसाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या नगरपंचायतींमध्ये सुरू असलेला प्रचार संपला असून, आज मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकांमध्ये जिल्ह्यांतील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. रायगडमध्येही नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदान सुरू झाले आहे. ८२ केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळच्या सत्रात मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. माणगाव, म्हसळा व तळा येथे सुनील तटकरे, पालीमध्ये भाजप आमदार तथा माजी मंत्री रवीशेठ पाटील व सुनील तटकरे, पोलादपूर नगरपचांयतमध्ये आमदार भरत गोगावले, खालापूरमध्ये शेकापचे आमदार जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, मंडणगड नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. जाणून घेऊयात अपडेट्स…

>> रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात

>> एकूण ८२ मतदान केंद्रांवर मतदान सुरू

>> रायगडमधील ३४ हजार ६४० मतदार बजावणार मतदानाचा हक्क

>> रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, मंडणगड नगरपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात, उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार

>> अनेक मतदान केंद्रांवर सकाळी मतदारांची गर्दी कमीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish