शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्याबद्दल संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…


नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याविषयी (shiv sena dasara melava) मोठं भाष्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, यंदाचा दसरा मेळावा प्रत्यक्ष व्हावा अशी इच्छा आहे. यंदा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही, असं ते म्हणाले. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीनं पार पडला होता.  राऊत म्हणाले की, यंदाचा ॲानलाईन पद्धतीने होणार नाही, तर प्रत्यक्ष पद्धतीने मेळावा होणार आहे. कोरोना नियमांचे पालन करून दसरा मेळावा होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर लवकरच निर्णय घेतील, असं ते म्हणाले. 

संजय राऊत म्हणाले की, सरकारी यंत्रणांचा वापर करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय.  शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्यात राजकारण काय, हे विरोधकांचं कर्तव्य आहे, असंही ते म्हणाले. राहुल गांधींना जाऊ दिले जाणार नाही. लोकशाहीत आवाज उठवणाऱ्यांची नाकेबंदी केली जातेय.  सरकार विरोधी बोलणा-यांना देशद्रोही ठरवलं जातंय, असा आरोप देखील संजय राऊतांनी केला. 

संजय राऊत यांनी काल म्हटलं होतं की, देशात नवी गुलामगिरीची सुरूवात झालीय. लखीमपूरची घटना म्हणजे आणीबाणी पेक्षा भयानक आहे. मोदींना गांधी घराण्याची भिती वाटतेय. म्हणून प्रियांका गांधींना अडवलं जातंय. योगींनी राजीनामा द्यायला पाहीजे. मोदी देशाचा अमृत महोत्सव साजरा करायला लखनौला जाताहेत पण अमृत महोत्सव रक्तानं माखला आहे, असंही राऊत म्हणाले. Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish