मुंबईतील धक्कादायक घटना, आई-मुलाचा मृतदेह दोन दिवस नाल्यात पडून; सीसीटीव्हीमुळे लागला छडा

मुंबईतील धक्कादायक घटना, आई-मुलाचा मृतदेह दोन दिवस नाल्यात पडून; सीसीटीव्हीमुळे लागला छडा


हायलाइट्स:

  • नाल्यात सापडला आई आणि मुलाचा मृतदेह
  • चेंबूरच्या लाल डोंगर येथील घटना

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: कुर्ला नेहरूनगरमधून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आई आणि मुलाचा मृतदेह चेंबूरच्या नाल्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. श्रुती महाडिक (३६) आणि राजवीर महाडिक (३) असे मृत आई आणि मुलाचे नाव असून ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान ज्या नाल्यामध्ये श्रुती आणि तिच्या मुलाचा मृतदेह सापडला त्याला लागूनच असलेल्या इमारतीमध्ये तिचे माहेर आहे.

नेहरूनगरमध्ये पती आणि सासरच्या इतर मंडळींसोबत श्रुती आणि राजवीर हे वास्तव्यास होते. बुधवारी राजवीरला सोबत घेऊन घराबाहेर पडलेली श्रुती उशिरापर्यंत घरी परतलीच नसल्याने पटीने नेहरूनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. बेपत्ता आई आणि मुलाचा माग सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेत असताना पोलिस चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात पोहोचले. लाल डोंगर येथील अल्टा विस्टा या इमारतीमध्ये श्रुतीचे माहेर आहे. सीसीटीव्हीमध्ये श्रुती मुलासह इमारतीमध्ये शिरताना दिसत आहे मात्र ती घरी गेलीच नाही. इमारतीमधून पुन्हा बाहेर येतानाही दोघे दिसत नसल्याने पोलिसांनी इमारतीच्या आजूबाजूचा पिंजून काढला. याच परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये इमारतीच्या पाठीमागील नाल्यामध्ये काहीतरी पडल्याने पाणी उडाल्याचे दिसले. पोलिसांनी नाल्याची पाहणी केली असता शुक्रवारी श्रुती आणि राजवीर यांचा मृतदेह सापडला.

श्रुती आणि राजवीर हे इमारतीमध्ये शिरल्यावर घरी न जाता थेट गच्चीवर जाऊन त्यांनी नाल्यात उडी घेतली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दोघांच्या मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले असून त्यातून मृत्यूचे कारण स्प्ष्ट होईल. चुनाभट्टी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून ही आत्महत्या आहे, हत्या की अन्य काही याबाबतच गूढ तपासानंतरच समोर येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: