व्यापाऱ्यांसाठी ‘मराठी पाटी’ खर्चिक

व्यापाऱ्यांसाठी ‘मराठी पाटी’ खर्चिक


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

दुकानांवर मराठी पाटी अनिवार्य केल्याच्या मुद्यावरून मुंबईतील व्यापारवर्गात आता बैठका सुरू झाल्या आहेत. पाटी बदलण्याच्या खर्चावरून दुकानदार कुरबूर करत असताना मनसेने व्यापाऱ्यांना इशारावजा टोला लगावला आहे.

महाराष्ट्राच्या मराठी भूमीत दुकानांवरील पाटी ही मराठीतच हवी, असा आदेश राज्य सरकारने काढला आहे. या आदेशानंतर व्यापारीवर्ग, दुकानदारांमध्ये वेगळीच कुरबूर सुरू आहे. दुकानावर नव्याने पाटी लावण्याबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची, याबाबत व्यापारी संघटनांचे एकत्रित विचारमंथन सुरू झाले आहे. काही स्थानिक व्यापारी संघटनांनी या पाटीसाठी एकत्रित कंत्राट देण्याबाबतही विचार सुरू केला आहे. ‘मराठी पाटी’ या विषयावरून मुंबईच्या विविध भागांतील व्यापारीवर्गात हालचाली सुरू झाल्या आहेत.

व्यापार क्षेत्राची अग्रणी संघटना असलेल्या अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) पाटी बदलण्यासाठीच्या खर्चाचा विषय समोर केला आहे. आधीच करोना संकटादरम्यान व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले. कर्मचाऱ्यांना पगार देता आलेले नसताना आता पाटी बदलण्यासाठी किमान २५ हजार रुपयांचा खर्च होईल, तो कसा करायचा?, असा प्रश्न ‘कॅट’ने उपस्थित केला आहे. मुंबई शहर, उपनगरसह महामुंबईतील सुमारे ४ लाख किरकोळ व घाऊक व्यापारी ‘कॅट’शी संलग्नित आहेत. त्यामुळेच ‘मराठी पाटी’बाबतही संघटना व्यापाऱ्यांचे नेतृत्व करीत असून त्यांच्यात विचारमंथन सुरू झाले आहे. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या सर्व व्यापाऱ्यांना इशारा मिळाला आहे.

‘खर्च अधिक कशाचा?’

‘पाटी बदलण्यासाठी खर्च असल्यास, पाटी बदलण्याचा खर्च अधिक की, दुकानाच्या काचा बदलण्याचा खर्च अधिक?’, असा प्रश्न ‘मनसे‘चे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर विचारला आहे. त्यांच्या या ट्विटवर जवळपास १५०० लाइक्स, २५० रीट्विट्स व २० कोट रीट्विट्ससह १०० जणांनी संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: