झाडांचे व्हावे ऑडिट,अंधेरीत झाड पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने स्थानिकांची मागणी

झाडांचे व्हावे ऑडिट,अंधेरीत झाड पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने स्थानिकांची मागणी


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

गुरुवारी अंधेरी सहार गावामधील १३ वर्षीय विद्यार्थ्याचा अंगावर नारळाचे झाड पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर याच परिसरातील दोरीने बांधून ठेवलेल्या आणखी एका नारळाच्या झाडाकडे स्थानिकांनी लक्ष वेधले आहे. तसेच विमानतळ रस्त्यावरील झाडांचे ऑडिट आणि त्याची देखभाल व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सहार गावातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर अनिरुद्ध मचाडो याच्या अंगावर नारळाचे झाड पडले. करोनामुळे फारसा बाहेर न जाणारा अनिरुद्ध पतंग उडवण्यासाठी म्हणून बाहेर गेला आणि त्याचा जीव गेल्याची हळहळ परिसरात व्यक्त होत आहे. खासगी डॉक्टरांकडूनही प्रथमोपचार न होता थेट कूपर रुग्णालयात नेण्यात आले. यामध्येही वेळ गेला. याप्रकरणी एफआयआर नोंदवला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मृत्यूप्रकरणी महापालिका, एमएमआरडीए, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड यापैकी कुणीही जबाबदारी घेत नाही, त्यामुळे एमएमआरडीए आणि मिआल यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला जावा, अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशनचे निकोलस अल्मेडा यांनी केली आहे.

या परिसरात कोणतेच प्रशासन थेट जबाबदारी स्वीकारत नसल्याने समस्या सोडवताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे जबाबदारी निश्चिती होणेही आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या पालकांना नुकसान भरपाईही मिळायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

कामांच्यावेळी हानी

विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मेट्रोचे भूमिगत काम सुरू होते. खोदकाम होण्याच्या काळात जे डंपर येत होते त्यांचा धक्का लागून झाडे कमकुवत झाली असावीत किंवा झाडाच्या बाजूलाच महापालिकेची सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था आहे. या सांडपाणी वाहून नेण्याच्या मार्गामध्ये सिमेंटमिश्रित पाणीही सोडण्यात आले होते. यामुळेही झाडाची मुळे सडली असावी, असा अंदाज वॉचडॉग फाऊंडेशनचे निकोलस अल्मेडा यांनी व्यक्त केला.

सुकलेली झाडे

पडलेल्या त्या झाडाच्या दुसऱ्या बाजूलाही एक पूर्ण वाकलेले झाड आहे. त्याला सध्या दोरीने बांधून ठेवण्यात आले आहे. तसेच जवळच असलेल्या कुंपणामध्ये अशोकाची सुकलेली झाडे आहेत. या सगळ्याची पाहणी करून, त्याचे ऑडिट करून त्याची योग्य देखभाल झाली पाहिजे, अशी मागणी स्थानिकांतर्फे करण्यात आली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: