उमेदवारांची धडधड वाढली, मतदारांची उत्सुकता शिगेला, नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान, १९ तारखेला निकाल


हिंगोली : नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Nagarpanchayat Election 2022) राज्यात उद्या उर्वरित जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वसाधारण जागेवर ही निवडणूक लढविली जात आहे.

या निवडणुकीमध्ये सध्या चांगलीच रंगत बघायला मिळते आहे. काल सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. प्रचार संपल्यानंतर सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधींकडून आता शांततेत मतदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत.

नेमका कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २१ डिसेंबर २०२१ ला यापूर्वी मतदान प्रक्रिया पार पडली. उर्वरित मतदान उद्या १८ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव (Sengaon Nagarpanchayat Election) आणि औंढा नगरपंचायतीचाही (Aundha Nagarpanchayat Election) समावेश आहे. या चार जागांसाठी विविध पक्षांकडून व अपक्ष मिळून एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत.

तर औंढा नगरपंचायतीमधून विविध पक्षाचे एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इथे होत असलेल्या निवडणुकीसाठी सर्व पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी चांगलीच मैदानं गाजवली आहेत. एकूणच चांगली प्रचाराची रणधुमाळी बघायला मिळाली.

उद्या मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर १९ जानेवारी २०२२ रोजी मागच्या १३ आणि या ४ अशा एकूण १७ प्रभागात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील कामाला लागली आहे.

उमेदवारांसह मतदारांचंही निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. नगरपंचायत मध्ये कोण बाजी मारणार? किती नव्या चेहर्‍यांना संधी मिळणार? हे मात्र निकालानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish