58 वर्षीय महिलेच्या हत्येचा 24 तासांत उलगडा, मैत्रिणीनेच केली हत्या, नेमकं कारण काय?

58 वर्षीय महिलेच्या हत्येचा 24 तासांत उलगडा, मैत्रिणीनेच केली हत्या, नेमकं कारण काय?
58 वर्षीय महिलेच्या हत्येचा 24 तासांत उलगडा, मैत्रिणीनेच केली हत्या, नेमकं कारण काय?


Dombivali Murder : डोंबिवली येथील एका 58 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. हत्येपश्चात घटना स्थळी काहीच पुरावे नसल्याने पोलिसांना हत्येचा आवाहन उभे ठाकले होते. पण नंतर तांत्रिक तपास करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे टिळकनगर पोलिसांनी सीमा खोपडे या 40 वर्षीय महिलेला अटक केली आहे. सीमा ही विजयाची मैत्रीण असल्याचंही समोर आलं आहे. त्याच परिसरात पोळी भाजी केंद्र चालवणाऱ्या सीमाची विजया यांच्या घरात गेल्या नंतर त्यांच्या दागिन्यांवर नजर गेली. ज्यानंतर  विजया झोपेत असताना त्यांचा गळा आवळून हत्या करत सीमा हिने त्यांच्या अंगावरील दागिनेही काढून घेतले. त्यामुळे हत्या चोरीच्या उद्देशाने केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पण यामागे आणखी आरोपी आणि इतर कारणे आहेत का? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत

डोंबिवली पूर्वेकडील टिळकनगर परिसरातील आनंद शीला या इमारतीत राहणाऱ्या 58 वर्षीय विजया बाविस्कर यांचा मृतदेह सोमवारी सकाळच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरात आढळला होता. विजया यांची कामवाली नेहमीप्रमाणे सकाळी काम करण्यासाठी त्यांच्या घरी आली .घराला कडी असल्याने कडी उघडून जेव्हा ती घरात गेली तेव्हा विजया यांचा मृतदेह दिसला. याबाबत तिने शेजाऱ्यांना सांगितले नंतर पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत तपास सुरु केला. विजया यांची गळा आवळून हत्या झाली हे उघड होताच पोलिसांनी तपास सुरु केला. विजया यांच्या नातेवाईकांनी तिचे काही दागिने गहाळ असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ही हत्या चोरीच्या उद्देशाने की संपत्तीच्या वादातून झाली आणि हत्या कोणी केली याबाबत पोलीसांनी तपास सुरु केला.

पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासून पाहिले. एका ठिकाणी एक महिला दिसून आली. रात्री तीन वाजताच्या सुमारास ही महिला हातात एक पिशवी चालत रस्त्याने जात होती. इतक्या रात्री रस्त्यावर चालणारी ही महिला कोण आहे या दिशेने पोलिसांचा तपास गेला. महिलेची ओळख पटली. या परिसरात पोळीभाजी केंद्र चालविणाऱ्या सीमा खोपडे असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या महिलेस ताब्यात घेतले. या महिलेने हत्येची कबूली दिली. विजया आणि सीमा यांची आधीपासून मैत्री होती. सीमा हिचे पोळी भाजी केंद्र होते. रविवारी सीमाला विजया यांनी रात्री घरी झोपण्यासाठी बोलावले. रात्री जेवण झाल्यावर गप्पा मारून दोघीही झोपल्या मात्र विजया गाढ झोपेत असताना सीमा यांनी त्यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. चोरीच्या उद्देशाने ही हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान सदर गुन्हयात आणखी कोणी आरोपीत आहेत का? हत्या चोरीच्या उद्देशाने झाली की आणखी काही उद्देश होता याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

हे ही वाचा – 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP MajhaSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: