INS Ranveer Blast : मुंबईत INS रणवीर युद्धनौकेत स्फोट, ३ जवान शहीद

INS Ranveer Blast : मुंबईत INS रणवीर युद्धनौकेत स्फोट, ३ जवान शहीद


मुंबई : आएनएस रणवीर (INS Ranveer) या युद्धनौकेवर स्फोट झालाय. मुंबईच्या नोव्हल डॉकयार्डात ही घटना घडलीय. आएनएस रणवीरच्या अंतर्गत येणाऱ्या कंपार्टम्पेंटमध्ये हा स्फोट झालाय. या स्फोटात नौदलाचे ३ जवान शहीद झालेत. तर ११ जण जखमी झालेत.

स्फोट झाल्यानंतर काही मिनिटांतच तात्काळ प्रतिसाद देत जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. आयएनएस रणवीर ईस्टर्न नेव्हल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होते आणि ते लवकरच बेस पोर्टवर परतणार होते, त्यावेळी ही घटना घडल्याचे निदर्शनास आल्याचं, भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती एएनआयने दिली आहे.

रणवीर या युद्धनौकेच्या इंटर्नल कंम्पार्टमेंटमध्ये हा स्फोट झालाय. स्फोट झाल्यानंतर जे इतर क्रू मेंबर होते, ते बाहेर येणाच्या प्रयत्नात होते, मात्र याच प्रयत्नादरम्यान तीन नौदल जवान शहीद झाले आहेत. स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. स्फोटाच्या कारणाचा सध्या तपास सुरु आहे. तसे आदेश दिले गेले आहेत.

नौदलाने या स्फोटाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघाताच्या कारणाचा तपास करण्यासाठी चौकशी मंडळाला आदेश देण्यात आले आहे. या अपघातात 11 जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे, त्यांच्यावर स्थानिक नेव्ही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर शहीद झालेल्या नौदलाच्या जवानांची अद्याप ओळख पटलेली नाही.

याआधी INS रणविजयमध्ये आगीची घटना

आजच्या दुर्दैवी घटनेआधी, यापूर्वी 23 ऑक्टोबर 2021 रोजी भारतीय नौदलाच्या INS रणविजयमध्ये आगीची घटना घडली होती. या घटनेत चार जण जखमी झाले. आयएनएस रणवीरमध्ये झालेल्या स्फोटानंतर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: