Mumbai INS Ranvir Blast : मुंबईत आयएनएस रणवीर युद्धनौकेवर स्फोट, तीन सैनिक शहीद


<p>मुंबईत नौदलाच्या आयएनएस रणवीर युद्धनौकेवर स्फोट झाला असल्याचं वृत्त आहे. या स्फोटात नौदलाचे तीन जवान शहीद झालेत तर ११ जण जखमी असल्याची माहिती मिळतेय. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या स्फोटाचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही. मुंबईतल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये ही घटना घडली. आयएनएस रणवीरच्या आतील भागातल्या एका कंपार्टमेंटमध्ये हा स्फोट झाला. आयएनएस रणवीर ही नौका पूर्व नौदल कमांडच्या अखत्यारीत होती. पूर्व आणि पश्चिम नौदल कमांड यांच्यासाठी साहित्याची ने-आण करण्याची जबाबदारी या नौकेवरच्या कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली होती.</p>
Source link