गांजा तस्करी : मध्यप्रदेश एनसीबीकडून जळगाव जिल्ह्यातील संशयित ताब्यात

गांजा तस्करी : मध्यप्रदेश एनसीबीकडून जळगाव जिल्ह्यातील संशयित ताब्यात


हायलाइट्स:

  • गांजा तस्करीच्या गुन्ह्यात कारवाई
  • जळगाव जिल्ह्यातील धरणगावातून एक संशयित ताब्यात
  • घटनेमुळे जिल्ह्यात उडाली खळबळ

जळगाव : मध्यप्रदेशातील इंदौर येथील गांजा तस्करीच्या गुन्ह्यात मध्यप्रदेश एनसीबीच्या पथकाने जळगाव जिल्ह्यातील धरणगावातून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विजय किसन मोहिते असं या संशयिताचं नाव आहे.

मध्यप्रदेशातील इंदौर शहरात जुलै महिन्यात गांजा तस्करीचा एक गुन्हा दाखल होता. या गांजा तस्करीचे कनेक्शन एरंडोल-कासोदा भागात असल्याची माहिती मध्यप्रदेश एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार काही दिवसापासून मध्यप्रदेश एनसीबीचे अधिकारी-कर्मचारी एरंडोल भागात लक्ष ठेवून होते.

Punjab Breaking: पंजाबमध्ये खळबळ; CM चन्नी यांच्या पुतण्याच्या घरी सापडले मोठे घबाड, तब्बल…

याच प्रकरणाच्या अधिक तपासात मध्यप्रदेशातील एनसीबीच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री २ वाजता धरणगाव शहरात सापळा रचून विजय किसन मोहिते याला ताब्यात घेतले.

दरम्यान, या कारवाईत एनसीबीच्या दोन अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश होता. एनसीबीने छापा टाकण्यापूर्वी धरणगाव पोलिसांना माहिती देत तेथील पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: