शेतात बेदम मारहाण करून पत्नीचा खून; आरोपी पती फरार


हायलाइट्स:

  • शेतात महिलेचा तिच्या पतीनेच केला खून
  • मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याचं कळताच पती झाला पसार
  • पळून जाणारा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सांगली : पलूस तालुक्यातील बुरुंगवाडी ते धनगाव मार्गावरील शेतात महिलेचा तिच्या पतीनेच खून केला आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. कांताबाई गणपत पवार (वय ४५, रा. मूळ गाव सडोली, ता. मावळ, जि. पुणे) असं मृत महिलेचं नाव आहे. खुनाच्या घटनेनंतर मृत महिलेचा पती गणपत पवार (वय ५०) हा घटनास्थळावरून पळून गेला आहे.

पलूस पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, गणपत पवार व त्याची पत्नी कांताबाई गणपत पवार हे दोघे धनगाव ते बुरुंगवाडी दरम्यान सदाशिव चव्हाण यांच्या शेतात राहून लाकडापासून कोळसा बनवण्याचं काम करत होते. शुक्रवारी दोघेही बुरुंगवाडी येथे बाजार करण्यासाठी गेले होते. बाजार करून रात्री उशिरा ते घरी परतले. यानंतर दोघांमध्ये झालेल्या वादातून गणपत याने पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला.

राज्यप्राणी शेकरूची विक्री? कॉलेज रोडवरील दुकानात छापा; संशयित मालक ताब्यात

मारहाणीनंतर पत्नी निपचित पडल्याचं लक्षात येताच पती पळून गेला. शनिवारी सकाळी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.

दरम्यान, धनगाव परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर संशयित गणपत पवार हा खुनाच्या घटनेनंतर पळून जाताना सीसीटीव्हीत दिसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेची फिर्याद कॉन्स्टेबल नवनाथ गोवर्धन राठोड यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली असून, अधिक तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग हे करत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish