Amarinder Singh: राहुल-प्रियांका गांधींना ‘अनुभवहीन’ म्हणणाऱ्या ‘कॅप्टन’ला काँग्रेसचं प्रत्यूत्तर

[ad_1]
हायलाइट्स:
- ‘राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे मला माझ्या मुलांप्रमाणे’
- ‘हे सगळं अशा पद्धतीनं संपुष्टात यायला नको होतं’
- काँग्रेसनं दिलेल्या वागणुकीमुळे अमरिंदर भावनात्मकरित्या जखमी
पंजाबमध्ये काहीही झालं तरी नवज्योत सिंह सिद्धू यांना कधीही मुख्यमंत्री होऊ देणार नाही. यासाठी मला कोणताही त्याग करावा लागला तरी मी त्यासाठी तयार असेल. सिद्धू यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवलं तर काँग्रेस विधासभेत जागांची दुहेरी संख्याही गाठू शकणार नाही, असं कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटलंय.
‘राहुल – प्रियांका अनुभवहीन’
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे मला माझ्या मुलांप्रमाणे आहेत. हे सगळं अशा पद्धतीनं संपुष्टात यायला नको होतं. मला यामुळे खूप दु:ख पोहचलंय. खरं तर भावा-बहिणीला अद्याप राजकारणाचा फारसा अनुभव नाही. हे स्पष्ट आहे की त्यांच्या सल्लागारांनी त्यांची दिशाभूल केली आहे, असं त्यांनी भावूक होत म्हटलं.
सोनियांवरही नाराज
मी जिंकल्यानंतर स्वत:हून राजकारणातून बाजुला होण्याची तयारी करत होतो परंतु, पराभवानंतर कधीही नाही. मी तीन आठवड्यांपूर्वीच सोनिया गांधींना राजीनामा सोपवण्याचा विचार बोलून दाखवला होता. तेव्हा त्यांनी मला काम सुरू ठेवण्यास सांगितलं. त्यांनी मला म्हटलं असतं तर मी तेही केलं असतं, असं म्हणत सोनियांवरची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेसचं प्रत्यूत्तर
यावर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रेनेत यांनी अमरिंदर सिंह यांना प्रत्यूत्तर दिलंय. ‘ज्येष्ठ व्यक्ती अनेकदा रागावतात परंतु, अशा पद्धतीची वक्तव्य त्यांना शोभा देत नाहीत. राजकारणात सूडभावना आणि द्वेषाला कोणतीही जागा नाही. आम्ही त्यांच्याहून लहान असल्यानं अपेक्षा करतो की ते आपल्या वक्तव्याचा पुनर्विचार करतील’, असं त्यांनी म्हटलंय.
पक्षात अपमान झाल्याची अमरिंदर यांची भावना
कॅप्टन अमरिंदर सिंह यांना पदावरून हटवण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाकडून थेट विधिमंडळ दलाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीपूर्वीच कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. यानंतर पक्षात आपला अपमान झाल्याची खंत अमरिंदर यांनी व्यक्त केली होती. सोबतच, आपलं काम कसं करावं आणि एकदा बोलावल्यावर परत कसं जावं, हे एक सैनिक म्हणून मला चांगलंच माहीत आहे, असंही यावेळी कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटलं.
[ad_2]
Source link