नेमको कंपनी मधील कामगारांच्या विविध समस्या विरोधात भाजपा आक्रमक, कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आ.प्रशांत ठाकूर याचं दिले निवेदन पत्र.
श्री दिपक जगताप-;खालापूर
खालापूर तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत असून या औद्योगिक नगरीतील कारखान्यात भुमीपुत्रावर कारखाना व्यवस्थापनाकडून अन्याय होत असल्याने या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भुमीपुत्र, लोकप्रतिनिधी, राजकीय नेते नेहमीचं आक्रमक होतानाचे पाहायला मिळाले असता होराळे ग्रामपंचायत हद्दीतील असलेल्या नेमको कंपनीच्या कारभाराबाबत खालापूर भाजपा आक्रमक झाली असून भुमिपुत्रावर अन्याय करू नका तसेच नोकरी भुमिपुत्रांना प्राधान्य दया अशा आशयाचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर याचे मागणी पत्र खालापूर भाजपाने निमको कंपनी व्यवस्थापनाला दिले असून या पत्राची कारखानदार व्यवस्थापनाने दखल घेतल्यास भाजपा स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही भाजपाच्या वतीने देण्यात आला.
याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, कोषाध्यक्ष सनी यादव, अंकुश मोरे, श्रीकांत भोईर, महेश कडू नागेश पाटील, परेश खोपकर आदी प्रमुख उपस्थित होते.
नेमको हा कारखाना खालापूर तालुक्यातील होराळे ग्रामपंचायत हद्दीत कार्यरत असून या कारखान्यात जवळपास 154 कामगार काम करित असताना या कारखान्यात बाहेरील कामगार व स्थानिक कामगार याच्यात दूजाभावाची वागणूक देत असल्याने या वागणुकीत स्थानिकांवर अन्याय होत असल्याने या स्थानिक कामगारांनी आपल्या व्यथा भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याशी मांडल्या असता या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी 14 फेब्रुवारी रोजी नेमको व्यवस्थापनाशी चर्चा करीत आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या मागणीचे पत्र दिले .
स्थानिक कामगारांचे वेतन व बाहेरील कामगारांचे वेतन यामध्ये तफावत असणे, कामगारांना पगाराची स्लिप न देणे, बोनस न देणे तसेच इतर विविध मागण्यांची पूर्तता करण्यात यावी अशा विविध विषयांवर चर्चा करित या सर्व तक्रारीवर लवकरच तोडगा काढावा अशी मागणी भाजपा नेत्यांनी कंपनी व्यवस्थापनाला केली.
तर यावेळी व्यवस्थापनाकडून आपले मत मांडताना पांडे म्हणाले की, या निवेदनाची दखल घेऊन माझ्या वरिष्ठांशी व कारखाना मालकांशी चर्चा लवकरच करून याची सर्व माहिती आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी देतो, असे पांडे म्हणाले.
नोकरी स्थानिक 80 % नागरिकांना प्राधान्य दयावे तसेच स्थानिक नोकरदार व बाहेरील नोकरदार याच्यातील असलेला पगार आणि बोनसमध्ये असलेली तफावत दूर करून सर्वांना समान पगार – बोनस दयावे. विठ्ठल मोरे (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष)
कंपनीतील स्थानिक कामगारांच्या अनेक तक्रारी आल्याने या तक्रारीच्या अनुषंगाने नेमको व्यवस्थापनाशी भेट घेऊन स्थानिक कामगारांच्या तक्रारी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर या निवेदन पत्राद्वारे व चर्चेतून मांडल्या आहेत. तर या तक्रारी कंपनी व्यवस्थापनाकडून लवकरात लवकर सोडवल्या न गेल्यास याठिकाणी भाजपा स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, तर या आंदोलनातून होणाऱ्या सर्व घडामोडींना कंपनी व्यवस्थापक जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
सनी यादव (कोषाध्यक्ष भाजपा)