युथ फोरम सोशल असोसिएशनचा सहावा वर्धापन दिन 20 फेब्रुवारी रोजी आयोजित.

पनवेल – सालाबादप्रमाणे या वर्षी युथ फोरम असोसिएशनचा सहावा वर्धापन दिन 20 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे . दरवर्षी संस्थेतर्फे समाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो.
तसेच सदर संस्थेतर्फे झालेल्या कामाचा आढावा या कार्यक्रमात जनते समोर मांडण्यात येतो.
मागील वर्षी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आलं होता. या वर्षी कोरोन विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या वर्षी संस्थेचा सहावा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला आहे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केवल गायकवाड यांनी सांगितले.
यावर्षी युथ फोरम सोशियल असोसिएशन या सामाजिक संस्थेचा सहाव्या वर्धापन दिनानिमित सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, उद्योजक व कोरॊना काळात सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पत्रकार बांधव यांचा रविवार दिनांक 20 फेब्रुवारी 2022 सायंकाळी 5 वाजता देवीचा पाडा पनवेल या ठिकाणी सन्मान सोहळा आयोजित केला आहे तरी आपण कोविड चे नियम पाळून या सोहळ्यात उपस्तिती रहावे ही नम्र विनंती संस्थापाक अध्यक्ष केवल गायकवाड यांनी केली आहे .
सदर कार्यक्रमासाठी गणेश म्हात्रे, नरेश सुरेश गायकवाड, आकाश देशमुख, मनोज कडू, सुरज यादव, ऋषिकेश शिंदे, प्रमोद मंडळ, रवी जाधव, अमोल गायकवाड, नागेश गायकवाड, महेश गायकवाड यांनी सदरील कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतलेली आहे .