कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूला जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणतो…

कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूला जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणतो…
कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूला जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणतो…


AUS vs PAK : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ तब्बल 24 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे. त्यांच भव्य स्वागत रविवारी इस्लामाबाद विमानतळावर करण्यात आलं. पण एका दिवसाच्या आतच नव्या वादाचा जन्म झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू अॅश्टन अगर याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानला न जाण्याची धमकी मिळाली असून त्याची पार्टनर मॅडलीनला ही धमकी पाठवण्यात आली आहे.

एका इंग्रजी न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, अगर याची पार्टनर मॅडलीनला मेसेज आला ज्यात लिहिलं होतं की, ‘अगर पाकिस्तानला जाता कामा नये. तो पाकिस्तानला गेला तर जीवंत परत नाही येणार.’ दरम्यान यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने दावा केला आहे की, अॅश्टन अगरची पार्टनर मॅडलीनला आलेली धमकी विश्वसनीय नसून पीसीबी आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात सुरक्षा एजन्सीजकडून तपासणी केली आहे. अशाप्रकारच्या सोशल मीडिया पोस्टला धोका मानण्याची गरज नाही, सध्यातरी यावर अधिक काही बोलणार नाही.’ 

ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्याचं वेळापत्रक (Australia Tour of Pakistan )
4 मार्च ते 8 मार्च – पहिला कसोटी सामना, रावळपिंडी 
12 मार्च ते16 मार्च – दूसरा कसोटी सामना, कराची 
21मारच ते 25 मार्च – तीसरा कसोटी सामना, लाहोर 
29 मार्च – पहिला एकदिवसीय सामना, रावळपिंडी
31 मार्च – दूसरा एकदिवसीय सामना, रावळपिंडी
2 एप्रिल – तीसरा एकदिवसीय सामना, रावळपिंडी
5 एप्रिल – टी20 सामना, रावळपिंडी

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP MajhaSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: