Alia Bhatt : रणबीर कपूरला कसा वाटला गंगूबाई काठियावाडी? आलियाने दिले उत्तर  

Alia Bhatt : रणबीर कपूरला कसा वाटला गंगूबाई काठियावाडी? आलियाने दिले उत्तर  
Alia Bhatt : रणबीर कपूरला कसा वाटला गंगूबाई काठियावाडी? आलियाने दिले उत्तर  


Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटने (Gangubai Kathiawadi) बॉक्स ऑफिसवर कल्ला केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकजण आलियाच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसत आहे. परंतु, रणबीर कपूरला गंगूबाई काठियावाडी कसा वाटला? याचे उत्तर चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. आलियाने स्वत: या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. 

 गंगूबाई काठियावाडीसाठी सर्वजण आलियाचे कौतुक करत आहेत. आलियाने या चित्रपटाच्या प्रमोशनची जबाबदारी एकटीने उचलली होती आणि त्यासाठी तिने सर्व शक्ती पणाला लावली होती. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट आलियाच्या कुटुंबानेही थिएटरमध्ये पाहिला असून आलियाचा अभिनय सर्वांनाच आवडला आहे. परंतु, यावर बॉयफ्रेंड रणबीर कपूरची कोणतीही प्रतिक्रिया आतापर्यंत समोर आलेली नाही. विशेष म्हणजे रणबीर कपूर सोशल मीडियावरही नाही. त्यामुळे चाहते त्याला विचारूही शकत नाहीत. अशा परिस्थितीत रणबीरला गंगूबाई काठियावाडी कसा वाटला? असा प्रश्न आलिया भट्टला वारंवार विचारला जात आहे. नुकतेच माध्यमांसोबत बोलताना हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला त्यावेळी आलियाने यावर धक्कादायक उत्तर दिले आहे.
 
रणबीर कपूरला गंगूबाई काठियावाडी कसा वाटला? या प्रश्नाचे उत्तर देताना आलियाने सांगितले की, रणबीरने चित्रपट पाहिला आहे आणि सर्वांना रणबीरचे उत्तर हवे आहे. परंतु, तो सोशल मीडियावर नाही, त्यामुळे आलिया त्याला किमान तिच्या चित्रपटाबद्दल काहीतरी बोलायला लावत आहे. जेणेकरुन चाहत्यांना त्याचे उत्तर मिळू शकेल.

रणबीर कपूरने आलियाच्या चित्रपटाबद्दल आतापर्यंत काहीही सांगितले नाही. परंतु सासू नीतू सिंग यांनी आलियाचे तोंडभरून कौतुक केले आहे.  चित्रपट पाहिल्यानंतर नीतू सिंह यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले  होते. या स्टोरीमध्ये त्यांनी लिहिले होते की, ‘पाहा आलियाने षटकार मारला आहे.’

महत्वाच्या बातम्या Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish
%d bloggers like this: