auto rikshaw accident: भरधाव रिक्षा उलटली, एक प्रवासी जागीच ठार, चालक मात्र सुखरुप

[ad_1]
या दुर्घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज १५ मार्चे रोजी खोपोली-पेण रोडवरून खोपोली कडून आडोशीरोडवरील ढेकू येथे जात असलेली रिक्षा एक मोठे वळण घेताना पलटी झाली. रिक्षा मधील एक प्रवासी जागेवरच ठार झाला तर अन्य दोन प्रवाश्यांसह दोन चिमुकले जखमी झाल्याने त्यानां खोपोली येथील नगरपालीका रुग्णालयात दाखल करण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा- महाडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत
या बाबत सविस्तर हकिकत अशी की, काल १५ मार्चे रोजी दुपारी ४ च्या सुमारास खोपोली-पेण रोडने पेणच्या दिशेला चाललेली तीन आसनी रिक्षा खोपोलीतील ऋषीवन हाँटेलजवळ अचानक उलटली. यात बसलेल्या प्रवाशांपैकी अनिल प्रजापती हे रिक्षातून बाहेर फेकले गेले. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, त्याच्या सोबत प्रवास करणारा दीपक गाड (३०) हे किरकोळ जखमी झाले. तर दीपक यांची पत्नी शांतीदेवी (२९) या गंभीर जखमी आहेत. तसेच त्याचे दोन चिमुकले रजत( वय ७) तर, एक तीन वर्षाचा बालक हे जखमी झाले आहेत. पत्नी शांतीदेवी या गंभीर जखमी असल्याने खोपोली नगरपालिका रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. तर, ७ वर्षांच्या रजतला छातीत मुका मार लागला असून त्याच्यावरही खोपोली रुग्णालयात उपचार करण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा- महाडमधील ‘त्या’ स्फोटामागचं कारण काय? लवकरच होणार उकल!
मयत अनिल प्रजापती आणि जखमी दीपक गाड हे दोघेही खालापूर तालुक्यातील ढेकू येथील रिद्धी-सिद्धी कपंनीत कामाला होते. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या जीवघेण्या अपघातातून MH 46 B 0810 या रिक्षाचे खूप नुकसान झाले असले, तरी रिक्षा चालक मात्र सुखरुप असल्याचे समजते.
क्लिक करा आणि वाचा- महाडमध्ये स्फोट; २ पोलीस कर्मचारी जखमी
[ad_2]
Source link