मानवी वापरासाठी महामार्ग निकृष्ट; कोर्ट कमिशनरने काढला हा निष्कर्ष

[ad_1]

म. टा. वृत्तसेवा, अलिबागः मुंबई-गोवा महामार्गाचे काम व्यवस्थित व तातडीने होऊन प्रवाशांचे हाल थांबावेत यासाठी आम आदमी पार्टीच्या येथील दोन कार्यकर्त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात दाखल झाला असून हा रस्ता मंजूर आरेखन आणि नकाशानुसार केला नसल्याने तो मानवी वापरासाठी निकृष्ट आहे असा निष्कर्ष कोर्ट कमिशनरने काढला आहे. दरम्यान, वडखळकडून पनवेलकडे जाणाऱ्या व येणाऱ्या रस्त्याचे व बायपासचे काम लवकर होण्यासाठी आम आदमी पार्टीचे दिलीप जोग यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या एनएचएआय ६६ व अन्य रस्त्यांच्या वस्तुस्थितीबाबत आपचे कार्यकर्ते ॲड. उपाध्ये यांनी अलिबाग न्यायालयात २०१६मध्ये दावा दाखल केला होता. या कामाची सत्यस्थिती समोर येण्यासाठी कोर्ट कमिशनरची नेमणूक करावी, अशी विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार न्यायालयाने कोर्ट कमिशनर म्हणून पी. एन. पाडळीकर यांची नेमणूक केली होती. कोर्ट कमिशनरने १ व २ फेब्रुवारी रोजी या महामार्गाची पाहणी केली व आपला पाहणी निष्कर्ष अहवाल न्यायालयात सादर केला.

वाचाःयशवंत जाधवांच्या दोन वर्षांत ३६ मालमत्ता; १३० कोटींच्या मालमत्तांची माहिती प्राप्तिकर छाप्यात उघड
आपचे अन्य एक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी वडखळ फ्लायओव्हरपासून पनवेलकडे जाणाऱ्या व येणाऱ्या सेवारस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. सेवारस्त्याचे हे काम अनेक वर्षे अपूर्णावस्थेत तसेच, धोकादायक स्थितीत आहे. याबाबत संबंधितांना अनेक वेळा कळवूनही दुर्लक्ष होत असल्याने जोग यांनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे.

वाचाः राजर्षी शाहू महाराजांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी; पालकमंत्री सतेज पाटील यांची मोठी घोषणा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *