Raigad News : रोहा गटविकास अधिकारी ‘असा’ अडकला ACB च्या जाळ्यात

Raigad News : रोहा गटविकास अधिकारी ‘असा’ अडकला ACB च्या जाळ्यात


रोहा : तक्रारदाराच्या बाजूने अहवाल देण्याकरिता १० हजार रुपयांची लाच घेताना रोहा गटविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पंडीत राठोड असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. यापूर्वी फेब्रुवारीत या अधिकाऱ्याने पाच हजार रुपयांची लाच घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पंडीत राठोड हे रोहा येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तळा पंचायत समितीचा अतिरिक्त गटविकास अधिकारीपदाचा कार्यभारही त्यांच्याकडे आहे. तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले. रोहा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानवी वापरासाठी महामार्ग निकृष्ट; कोर्ट कमिशनरने काढला हा निष्कर्ष

Pravin Darekar : प्रवीण दरेकर आणखी अडचणीत; सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

तक्रारदाराविरोधात नवी मुंबईतील कोकण भवनमध्ये विभागीय चौकशी सुरू आहे. पंडीत राठोड यांना विभागीय चौकशीतील सादरकर्ता अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. या विभागीय चौकशीमध्ये राठोड यांनी तक्रारदाराच्या बाजूने अहवाल पाठविण्याकरिता १५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता लाचस्वरूपात त्यांनी २८ फेब्रुवारी 2022 रोजी स्वीकारला. उर्वरित १० हजार रुपयांची मागणी केली म्हणून, तक्रारदाराने राठोड यांच्याविरोधात एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, आज, २५ मार्च रोजी पचांसमक्ष पडताळणी करुन १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राठोड यांना रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांना अटक करून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Nitesh Rane vs Vaibhav Naik : चोराच्या उलट्या बोंबा; नितेश राणेंच्या ‘त्या’ आरोपानंतर शिवसेना आमदाराचं जोरदार प्रत्युत्तरSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish