mumbai pune expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर टँकर पलटी, वाहतूक कोंडीने वाहनांच्या रांगा

mumbai pune expressway traffic jam


खोपोली, रायगड: मुंबई-पुणे एक्स्प्रस-वे वर टँकर पलटी होऊ मोठा अपघात ( mumbai pune expressway traffic jam ) झाला आहे. या अपघातामुळे २ ते ३ किमी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. एक्स्प्रेस-वे वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

खोपोली हद्दीतील अम्रुतांजन पुलाखाली मुंबईला येणारा केमिकलचा टँकल पलटी झाला आहे. मुंबईकडेल येणाऱ्या एका लेनवर टँकर पलटी झाला आहे. दुसरी लेन बंद करण्यात आली आहे. आय.आर.बी यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस, डेल्टा फोर्स, खोपोली पोलिसांचे मदत कार्य सुरू आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर टँकर पलटी

केमिकलचा टँकर पलटी झाल्याने केमिकल एक्स्प्रेस-वेवर सांडले आहे. जवळपास २०० ते ३०० मीटर रस्त्यावर केमिकल पडले आहे. आता हा रस्ता सफाई करण्याचे काम सुरू आहे. पण या घटनेने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish