T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघात मोठा बदल, अक्षर पटेलऐवजी ‘या’ खेळाडूला संधी

T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघात मोठा बदल, अक्षर पटेलऐवजी ‘या’ खेळाडूला संधी
T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघात मोठा बदल, अक्षर पटेलऐवजी ‘या’ खेळाडूला संधी


T20 World Cup 2021: आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकासाठी मूळचा पालघरचा अष्टपैलू शार्दूल ठाकूरचा (shardul thakur) भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त अष्टपैलू हार्दिक पांड्याला (Hardik pandya)कव्हर म्हणून शार्दूल ठाकूरला भारतीय संघात स्थान देण्यात आल्याचं समजतं. पण धक्कादायक बाब म्हणजे बीसीसीआयच्या निवड समितीनं हार्दिक पांड्याला भारतीय संघात कायम ठेवलं आहे. निवड समितीनं भारतीय संघव्यवस्थापनाशी चर्चा करून डावखुरा स्पिनर अक्षर पटेलला भारताच्या विश्वचषक संघातून वगळलं असून, त्याला राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आलं आहे. अष्टपैलू शार्दूल ठाकूरचा आधी भारताच्या राखीव खेळाडूंमध्ये समावेश होता. त्याला अक्षर पटेलऐवजी भारताच्या मुख्य संघात संधी देण्यात आली आहे. त्यामुळं आता श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि अक्षर पटेल हे तिघं राखीव खेळाडू असतील. 

ICC टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन , शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी. 

स्टँड-बाय खेळाडू: श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि अक्षर पटेल.
भारतीय संघाची नवी जर्सी लाँच; BCCIनं ट्विट करत दिली माहिती

यूएई (UAE)  आणि ओमानमध्ये सुरू होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची  (Team India) नवी जर्सी लाँच करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयने (BCCI)  काल (13 ऑक्टोबर) ट्वीट करून  भारतीय क्रिकेट संघ नवी जर्सी  लाँच केली आहे. बीसीसीआयने ट्वीटमध्ये सांगितलं आहे की, ‘बिलियन चीअर्स, जर्सी सादर करत आहोत’ बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मासोबत भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू दिसत आहेत. बीसीसीआयने आज होणाऱ्या भारतीय संघाच्या नव्या जर्सीच्या लाँचबद्दल माहिती दिली होती. भारतीय संघाची ही नवी जर्सी जुन्या जर्सीपेक्षा थोडी वेगळी आहे. आत्तापर्यंत भारतीय संघ जी जर्सी परिधान करत होता ती निळ्या रंगाची होती, ही नवी जर्सी देखील निळ्या रंगाची आहे, परंतु यावरील डिझाइन थोडी वेगळी आहे. या जर्सीवर निळ्या रंगाचे पट्टे दिसत आहेत. 

IPL 2021 : पर्पल कॅप हर्षलकडे तर ऑरेंज कॅपसाठी ऋतुराजची दावेदारी, आतापर्यंत सर्वाधिक चौकार, षटकार कुणाचे?

24 ऑक्टोबर रोजी होणार पहिला सामना 
भारतीय संघ 24 ऑक्टोबर रोजी टी20 वर्ल्ड कपची पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरोधात असेल. जवळपास दोन वर्षानंतर पाकिस्तान आणि भारताचे क्रिकेट संघ आमने- सामने येणार आहेत. पाकिस्ताननंतर भारत 31 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये न्यूझीलंडच्या विरोधात सामना खेळेल. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी अबूधाबीमध्ये टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तान विरोधात असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish
%d bloggers like this: