‘आती क्या रूम पे’ म्हणत महिला कर्मचाऱ्याचा छळ, डॉमिनोजच्या व्यवस्थापकाला अटक


खोपोली, रायगड : डॉमिनोज पिझ्झामध्ये काम करणाऱ्या एका व्यवस्थापाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काम करणाऱ्या एका महिलेचा छळ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी संतोष यादव याच्याविरोधात कलम ३५४, ५०९ अतंर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पीडित महिलेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

आरोपी हा ‘डॉमिनोज पिझ्झा’च्या खोपोली आऊटलेटमध्ये वरिष्ठ अधिकारी आहे. त्याच्याविरोधात व्यवस्थापनाकडे तक्रार करूनही आपल्याला न्याय मिळणार नाही, प्रसंगी नोकरी सोडण्या करता दबावच येईल. या कारणाने पीडित महिलेने आरोपी संतोष यादव याच्या आत्याचारला त्रासून थेट पोलिसात धाव घेतली. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अखेर आरोपीला अटक झाली.

काय आहे प्रकरण?

‘तू मेरे साथ मेरे रूम पर चल, मेरे रूम पर कोई नही. तुझसे आकेले में बात करनी है’, असे आरोपी संतोष लछिराम यादव (वय ३५) हा २४ मार्चला तक्रारदार महिलेला बोलला. तो सतत पीडित महिलेला कामात हिणावत होता, असा आरोप महिलेने केला आहे. खोपोली ते शिळफाटा दरम्यान इन्फीनिटी या इमारतीत तळ मजल्यावर दर्शनी भागात डॉमिनोज पिझ्झाचे आउटलेट आहे. तक्रारदार आणि आरोपी दोघेही तिथे कामाला आहेत.

ड्युटी रजिस्टर दाखवण्यास सांगत आरोपी संतोष यादव याने महिलेच्या हाताला अश्लील स्पर्श केला. ‘तू व्यवस्थित काम करत नाहीस. तसेच माझे समाधान देखील करत नाहीस, असे बोलत त्याने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यामुळे संतापलेल्या पीडित महिलेने आरोपी विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.

Raigad News : रोहा गटविकास अधिकारी ‘असा’ अडकला ACB च्या जाळ्यात

दरम्यान, महिला कामावर असताना तिने आपल्या पतीला आरोपीच्या छाळाची माहीती दिली. पतीने सदर प्रकार काही पत्रकारांच्या कानावर घातला. काही पत्रकार तिथे पोहचले. त्यावेळी डॉमिनोज पिझ्झातील स्टाफकडे याबाबत माहिती विचारली. सर्व स्टाफ हे फोनवर वरिष्ठांच्या सपंर्कात होते. तसेच इतर महिला कर्मचारी देखील तक्रारदार महिलेला वरिष्ठांशी बोलणं करुन देऊन तक्रार न देण्यास भाग पाडत असल्याचे दिसून आले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish