Aryan Khan: आर्यन खानला जामीन मिळणार की नाही?; एनसीबीचे वकील कोर्टात म्हणाले…

Aryan Khan: आर्यन खानला जामीन मिळणार की नाही?; एनसीबीचे वकील कोर्टात म्हणाले…


मुंबई: अमलीपदार्थ प्रकरणात आरोपी आर्यन खान आणि इतर आरोपीना जामीन मिळावा यासाठी आरोपींच्या वकिलांकडून जोरदार प्रयत्न सुरू असले तरी अमली पदार्थ विरोधी विभागाकडून आरोपींना जामीन कसा मिळणार नाही यासाठी न्यायालयात जोरदार बाजू मांडली जात आहे. आज न्यायालयात सुनावणी सुरू असून एसीबीतर्फे जोरदार युक्तीवाद करण्यात आला. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात शोविक चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर निर्णय देताना एनडीपीएस कायद्यातील सर्व गुन्हे हे अजामीनपात्र असल्याचे मुंबई हायकोर्टाने नमूद केले आहे. या प्रकरणात देखील अनेक आरोपींकडून अमलीपदार्थ हस्तगत केले आणि घटनांची साखळी गुंतलेली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. हे पाहता कोणत्याही आरोपीला जामीन देणे योग्य होणार नाही, असा युक्तीवाद एनसीबीचे वकील अनिल सिंग यांनी आज कोर्टात केला. (it would not be appropriate to grant bail to any accused in the drug case argued ncb lawyer anil singh in court today)

आर्यन खान हा नियमित अमलीपदार्थ सेवन करतो- सिंग

न्यायालयात युक्तीवाद करताना एनसीबीचे वकील अनिल सिंग म्हणाले की, आर्यन खान हा प्रथमच अमलीपदार्थ सेवन करणारा आहे असे नसून तो नियमित अमलीपदार्थ सेवन करणारा आहे असे प्रथमदर्शनी पुराव्यांतून दिसत आहे. छाप्यादरम्यान आरोपी अरबाझ मर्चंटकडून चरस हस्तगत झाले असून ते दोघांसाठी होते, असे अरबाझने दिलेल्या जबाबातून स्पष्ट होत आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘कुणी तुमच्या खिशात पुडी टाकून तुम्हाला अटक करेल’; पवारांचा एनसीबीवर हल्लाबोल

एनसीबीच्या तपास अधिकाऱ्याने पंचनामा करून चरस हस्तगत केल्याचे नमूद केले आणि ते चरस दोघांसाठी असल्याचे अरबाझने सांगिल्याचे त्यात नमूद केले आहे. तसेच आर्यन खान अमलीपदार्थ घेत असल्याचे त्याने त्यात कबूलही केलेले आहे. त्या पंचनाम्यावर दोघांनी सह्याही केलेल्या आहेत. त्यामुळे पूर्ण जाणीव ठेवून आरोपींनी अमलीपदार्थ बाळगले होते, हे स्पष्ट होते, असे सिंग यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

जेव्हा कोणाकडे अमलीपदार्थ सापडते तेव्हा तपासाच्या टप्प्यावर आणि खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन निर्णय येईपर्यंत तपास संस्थेने केलेला आरोप खरा आहे, असे मानायला हवे, असे एनडीपीएस कायद्यातील ३५ कलम म्हणते, असेही सिंग यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- मावळ घटनेला भाजप जबाबदार, लोकांच्या हे लक्षातही आलं: पवार

सिंग यांनी आरोपींच्या वकिलाचा युक्तीवाद खोडून काढला

अरबाझ मर्चंटसाठी काल युक्तिवाद मांडताना अ‍ॅड. तारक सय्यद यांनी दावा केला की, पंचनाम्यात आर्यन व अरबाझचा मोबाईल जप्त केल्याचा उल्लेखच नाही. त्यावर त्यांनी त्यांच्या जामीन अर्जात हा मुद्दाच घेतलेला नाही. म्हणून आम्ही त्याविषयी प्रतिज्ञापत्रात उत्तर दिले नाही. दोन्ही आरोपींनी स्वतःहून मोबाईल एनसीबीच्या हवाली केले आणि तसे एनसीबीच्या कागदपत्रांत नमूद आहे. त्यामुळे मोबाईल जप्तच केला नाही तर व्हाट्सअप संभाषण कुठून मिळवले, या अरबाझच्या युक्तिवादाला काही अर्थ नाही, असे सिंग यांनी सय्यद यांचा युक्तीवाद खोडून काढत म्हटले आहे.

या प्रकरणात कटाचा भाग आहे असे म्हटले जात असले करी कटाविषयीचे कलम लावलेच नाही, असा युक्तिवाद आर्यनतर्फे करण्यात आला. पण त्याला काही अर्थ नसल्याचे सिंग म्हणाले. कारण तपास अजूनही सुरूच आहे आणि तपाससंस्था कधीही आरोपींम कलम २९ लावू शकते. तसेच, जेव्हा आरोपींच्या गटामधील कोणाकडेही व्यापारी प्रमाणातील अमलीपदार्थ सापडते तेव्हा कलम २९ हे लावले जाते, असे अनिल सिंग म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- पाक, यूपीतील हॅकर्सनी केला पोलिस अधिकाऱ्याचा ईमेल हॅक; सरकारी खात्यांमध्ये खळबळ

सध्या न्यायाधीशांनी सुनावणी थांबवली असून दुपारी पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish
%d bloggers like this: