आर्यन खान प्रकरणावर रिया चक्रवर्तीची पोस्ट; म्हणाली, तुम्ही ज्या परिस्थितीतून…

आर्यन खान प्रकरणावर रिया चक्रवर्तीची पोस्ट; म्हणाली, तुम्ही ज्या परिस्थितीतून…
आर्यन खान प्रकरणावर रिया चक्रवर्तीची पोस्ट; म्हणाली, तुम्ही ज्या परिस्थितीतून…


हायलाइट्स:

  • रिया चक्रवर्तीची सोशल मीडियावर चर्चा
  • आर्यन खानशी संबंधित शेअर केली पोस्ट
  • अनेक युझर्सने दिल्या रियाच्या पोस्टवर प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.बुधवारी देखील तिने एक गुढ पोस्ट शेअर केली की त्यामुळे रियाची सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली. विशेष म्हणजे तिने तिच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर शेअर केलेली ही पोस्ट आर्यन खान प्रकरणाशी निगडीत आहे. त्यामुळे नेटिझन्समध्ये या पोस्टची आणखी चर्चा झाल्याचे दिसून आले.

‘अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरींमध्ये ही पोस्ट शेअर केली. त्यावर आता युझर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्ही जिथून प्रवास करत असता, तिथून पुढे जायला हवे.’

आर्यनच्या प्रकरणात रियाचा झाला होता उल्लेख
जेव्हा याअगोदर आर्यन खानच्या जामिनावर सुनावणी सुरू होती, त्यावेळी रिया चक्रवर्तीचा देखील उल्लेख झाला होता. अतिरिक्त महाधिवक्ता अनिल सिंह यांनी एनसीबीच्यावतीने आर्यनच्या कोठडीची मागणी केली होती. ते म्हणाले होते की, कसे रिया चक्रवर्तीच्या प्रकरणात लावण्यात आलेले आरोप हे जामिन मिळू न शकणारे होते.

शाहरुख खानच्या घरी पोहोचले होते कलाकार
एनसीबीने दोन ऑक्टोबरला कारवाई करुन एका क्रूझमधील पार्टीतून शाहरुख खानच्या मुलासह अन्य व्यक्तींना अटक केली होती. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेकांना मोठा धक्का बसला होता. अनेक सेलिब्रिटींनी या प्रकरणात पाठींबा देण्यासाठी शाहरुख खानचे घर असलेल्या ‘मन्नत’ बंगल्यावर हजेरी लावली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish
%d bloggers like this: