lucknow super giants win लखनौच्या नवाबांचा पहिला विजय; चॅम्पियन चेन्नईचा सलग दुसरा पराभव

lucknow super giants win लखनौच्या नवाबांचा पहिला विजय; चॅम्पियन चेन्नईचा सलग दुसरा पराभव

[ad_1]

मुंबई: आयपीएल २०२२मध्ये गुरुवारी झालेल्या सातव्या लढतीत लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. लखनौचा या हंगामातील हा पहिलाच विजय आहे. याआधी पहिल्या लढतीत त्यांचा परभव झाला होता. पण दुसऱ्या सामन्यात त्यांनी शानदार कामगिरी केली. तर गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा हा सलग दुसरा पराभव ठरलाय.

वाचा- ‘घरी बसून IPL बघावं लागतंय, स्वत:चा खूप राग येतोय’

चेन्नईने दिलेल्या २११ धावांचा पाठला करताना लखनौला डी कॉक आणि कर्णधार केएल राहुल यांनी दमदार सुरूवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागिदारी करून पाया पक्का केला. चेन्नईच्या गोलंदाजांना पहिली विकेट मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. अखेर ११व्या षटकात प्रिटोरियसच्या चेंडूवर रायडूने राहुलचा कॅच घेतला आणि चेन्नईला पहिली विकेट मिळाली. राहुलने २६ चेंडूत ४० धावा केल्या. यात २ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. दरम्यान डी कॉकने ३४ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते. राहुल बाद झाल्यानंतर आलेला मनिष पांडेला तुषार देशपांडेने ५ धावांवर माघारी पाठवले.

वाचा- IPL 2022 : मुंबईची ताकद वाढली; मॅच विनर खेळाडू पलटनमध्ये परतला

एविन लुईसने डी कॉकसह धावांचा वेग वाढवला. ही जोडी धोकादायक वाटत असताना प्रिटोरियस पुन्हा एकदा संघाच्या मदतीला आला. त्याने डी कॉकला ६१ धावांवर बाद केले. तेव्हा लखनौला ३० चेंडूत ६७ धावांची गरज होती. हुड्डा बाद झाल्यानंतर एविन लुईसकडून धुलाई सुरूच होती. त्याने २३ चेंडूत नाबाद ५५ धावांचा पाऊस पाडला, यात ३ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. दुसऱ्या बाजूला आयुष बदोनीने ९ चेंडूत नाबाद १९ धावा करत संघाचा विजय पक्का केला. अखेरच्या षटकात ८ धावांची गरज असताना त्याने षटकार आणि एक धाव घेत विजय साकारला. त्यात दोन वाइड चेंडूची मदत मिळाली.

त्याआधी लखनौचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या डावाची सुरूवात रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड यांनी केली. उथप्पाने पहिल्या चेंडूपासून धुलाई करण्याचे ठरवले. त्याने पहिल्या दोन चेंडूवर सलग दोन चौकार मारून इरादा स्पष्ट केला. त्याने पहिल्या ओव्हरमध्ये आवेश खानला १४ धावा ठोकल्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये उथप्पा शांत बसला नाही. त्याने षटकार आणि चौकारासह १२ धावा केल्या. यामुळे चेन्नईने २ षटकात २६ धावा केल्या. तिसऱ्या षटकात चेन्नईला मोठा धक्का बसला. गेल्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा ऋतुराज गायकवाड फक्त १ धाव करून धावाबाद झाला. त्याच्या जागी आलेल्या मोईन अलीने उथप्पा सोबत लखनौच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. दरम्यान पॉवर प्लेमध्ये चेन्नईने १ बाद ७३ अशी धावसंख्या केली. आयपीएलच्या इतिहासातील ही चौथ्या क्रमांकाची मोठी धावसंख्या ठरली. उथप्पाने फक्त २५ चेंडूत ५० धावा केल्या. पण अर्धशतकानंतर तो बाद झाला. त्याला रवी बिश्नोईने बाद केले. उथप्पाने अली सोबत दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागिदारी केली. चेन्नईने ९.१ षटकात १०० धावा पूर्ण केल्या. उथप्पा बाद झाल्यानंतर मोईन अली फार काळ टीकला नाही. त्याने २२ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकारांसह ३५ धावा केल्या.

उथप्पा-अली जोडी बाद झाल्यानंतर धावांचा वेग कमी होईल असे वाटले होते. पण शिवम दुबे आणि अंबाती रायडू यांनी गोलंदाजांना विश्रांती दिली नाही. यात त्यांना साथ मिळाली ती लखनौच्या खराब क्षेत्ररक्षणाची त्यांनी कॅच तर सोडलेच पण त्याच धावा देखील दिल्या. रायडूने २० चेंडूत २७ धावा केल्या. रायडू बाद झाल्यानंतर शिवमने आक्रमक फलंदाजी सुरू केली. १९व्या षटकात तो बाद झाला. त्याने ३० चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४९ धावा केल्या. अखेरच्या षटकात जडेजा १७ धावांवर माघारी परतला. अखेर चेन्नईने २० षटकात २१० धावा केल्या. धोनीने ६ चेंडूत नाबाद १६ धावा केल्या.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *