Covid Restrictions: महाराष्ट्राच्या पावलावर पाऊल; ममता बॅनर्जी यांनीही घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Covid Restrictions: महाराष्ट्राच्या पावलावर पाऊल; ममता बॅनर्जी यांनीही घेतला ‘हा’ मोठा निर्णय

[ad_1]

कोलकाता: केंद्र सरकारचे निर्देश आणि राज्यातील करोना स्थिती लक्षात घेत ममता बॅनर्जी यांच्या सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यात करोना संबंधी सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासूनच राज्य निर्बंधमुक्त होणार आहे. करोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर मार्च २०२० मध्ये सर्वप्रथम निर्बंध लावण्यात आले होते. त्यानंतर कमीजास्त प्रमाणात निर्बंधांच्या बेड्या कायम होत्या. आता मात्र निर्बंध पूर्णपणे उठवले जात आहेत. त्यात महाराष्ट्रापाठोपाठ पश्चिम बंगालचा नंबर लागला आहे. ( West Bengal Covid Restrictions Breaking News )

वाचा :आनंदाची बातमी! महाराष्ट्र मास्कमुक्त, गुढीपाडव्याला शोभायात्रांना परवानगी

भारत दोन वर्षांनंतर संपूर्ण निर्बंधमुक्तीच्या दिशेने चालला आहे. केंद्राच्या निर्देशांनंतर राज्यपातळीवर त्याची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २ एप्रिलपासून सर्व कोविड निर्बंध उठवले जाणार आहेत तर पश्चिम बंगालमध्ये आज मध्यरात्रीपासूनच निर्बंधांना पूर्णविराम दिला जाणार आहे. याबाबत ममता बॅनर्जी यांच्या सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ‘ करोना संसर्गाच्या अनुषंगाने राज्यात लागू असलेले सर्व निर्बंध उठवण्यात येत आहेत. आज मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी करण्यात येईल. मात्र, स्वच्छतेबाबतचे नियम यापुढेही पाळावे लागणार आहेत. यात मास्क वापरणे , हात स्वच्छ धुणे , सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे व इतर प्रोटोकॉल पुढील आदेशापर्यंत कायम राहतील ,’ असे सरकारच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

वाचा :बिहारमध्येही भाजपचा मुख्यमंत्री?; नितीश यांना राज्यसभेवर पाठवणार आणि…

दरम्यान, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानेही निर्बंध शिथील करण्याबाबत मोठे पाऊल उचलले आहे. राजधानी दिल्लीत मास्क सक्ती होती. मास्क नसल्यास ५०० रुपये दंड आकारला जात होता. त्यातून आता दिल्लीकरांची सुटका होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय गेल्यास आता दंड केला जाणार नाही. याबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

वाचा :वादग्रस्त ‘अफस्पा’ कायद्यासंबंधी गृहमंत्री अमित शहांकडून महत्त्वाची घोषणा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *