Bs4 सविधान अभियानाअंतर्गत दिनांक 10 एप्रिल रोजी रसायनी मध्ये संविधान बाईक रॅलीचे आयोजन

Bs4 सविधान अभियानाअंतर्गत दिनांक 10 एप्रिल रोजी रसायनी मध्ये संविधान बाईक रॅलीचे आयोजन

Bs4 अर्थात भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन अभियाना अंतर्गत रविवार दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी चार वाजता सविधान बाईक रॅली चे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चांभार्ली या ठिकाणी करण्यात आले आहे.


भारतीय संविधान भारतामध्ये सर्वोच्च आहे. भारतीय नागरिक संविधानातून प्राप्त अधिकारांचा वापर दैनंदिन जीवनामध्ये करत असतात. मूलनिवासी बहुजन समाजामध्ये संविधानाची चेतना निर्माण करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.


या बाईक रॅली मध्ये ओबीसी एस सी एसटी शेतकरी मजदूर महिला कर्मचारी विद्यार्थी युवक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बामसेफ संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुजित सोनावळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

en_USEnglish