About Us

About Us

आपला महाराष्ट्र मिडीया हे एक माध्यम आहे आपल्या पर्यंत पोहोचण्याचा या मधून आम्ही आपलं महाराष्ट्रातील होणाऱ्या चालू घडामोडी संदर्भात माहिती देणार आहोत. मिडीया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि या द्वारे सर्व घडामोडी आपल्या पर्यंत पोहोचावा अशी संपादकीय मंडळाची अपेक्षा आहे.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ” कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्रांची आवश्यकता असते, ज्या चळवळीचे वर्तमान पत्र नसेल तर तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्यां प्रमाणे असते.” त्या काळची परिस्थिती ही विशिष्ट जातींची चाकरी करणारी अस्पृश्यांअवर अन्याय करणारी होती म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेकडर यांनी जनता, मूकनायक , प्रबुद्ध भारत अशी वर्तमानपत्रे सुरू केली होती. त्यांची सर्व वर्तमानपत्रे ही ध्येयवादाने भारलेली होती, नैतिकता हा त्यांनी वृत्तपत्राचा कणा मानला होता. महाराष्ट्राला ध्येय शील पत्रकारितेची परंपरा आहे. म्हणून व्यतिथ अंतकरणाने पण परखड पाने आपल्या ध्येया पासून वंचित होणाऱ्या वृत्तपत्रांना त्यांनी मूळ वैचारिक बैठकांची जाणीव करून दिली होती. वृत्तपत्रांनी आचारसंहिता नाही पाळली तर त्यांचे तंत्र स्वैर असे , तर सामान्य निरक्षर माणसे रान भैरी होतील असे नेहमी त्यांना वाटत.

आकाश दिलीप कांबळे ( मुख्य संपादक )

जाहिरातीशिवाय वृत्तपत्र जगू शकत नाही , हे खरे असले तरी वृत्तपत्रांनी जाहिरातींच्या आहारी का आणि कितपत जावे ? आर्थिक कारणासाठी जाहिरातीची आवश्यकता असल्या तरी कोणत्या जाहिराती प्रकाशित कराव्यात या बद्दल संहिता असली पाहिजे . असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणत.

गोपीनाथ सोनावणे (मुख्य संपादक)

आणि म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराना अभिवादन करून आम्ही १४ एप्रिल २०२० रोजी आपला महाराष्ट्र मिडीया या Youtube चॅनेल ची सुरुवात केली. आणि आता साधारण पणे १ वर्ष पूर्ण होऊन सर्वांची चांगली साथ लाभलेली आहे . आणि यासाठी आम्ही आपल्या सेवेत हे न्युज वेब पोर्टल आणले आहे .आपण आम्हाला अशीच पूढे साथ द्याल ही अपेक्षा करतो .

आकाश दिलीप कांबळे (संपादक)
गोपीनाथ काशिनाथ सोनावणे (संपादक)